সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, September 20, 2018

जुनोना- जलमहलची झाली वाताहत

जुनोना- जलमहलचे व्हावे सौंदयीकरण
पुरातत्वीय दृष्टया संवर्धन करून पर्यटन विकास करण्याची इको-प्रोची मागणी


चंद्रपूरः गोंडराजे खांडक्या बल्लाळशाह यांच्या काळात बांधकाम झालेले जुनोना गावाच्या तलावाच्या काठावरील जलमहल आहे. या जलमहल अजुनही पुरातत्व विभागाचे लक्ष न गेल्याने वाताहत झाली आहे. वेळो-वेळी इको-प्रो व्दारा ‘जलमहल’ परिसराची स्वच्छता अभियान राबविण्यात आलेले आहे. चंद्रपूर शहरालगत असलेल्या जुनोना तलाव परिसरातील निसर्गरम्य परिसरात बांधण्यात आलेले ऐतिहासिक गोंडकालिन ‘जलमहल’ पुरातत्व विभागाने ताब्यात घेऊन त्याचे संवर्धन करण्याची तसेच सौदर्यीकरन करून पर्यटनदृष्टया विकसीत करण्याची मागणी इको-प्रोच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केलेली आहे.



चंद्रपूर शहर आणी जिल्हा ऐतिहासिक गोंडकालिन अनेक वास्तु करिता ओळखला जातो. चंद्रपूरसह विदर्भाच्या भुप्रदेशावर 500 अधिक वर्ष राज्य करणारे गोंडराजे यांनी आपल्या कार्यकाळात किल्ले, मंदीरे, समाध्या, बावडया अशा अनेक वास्तुचे बांधकाम केलेले आहे. त्यापैकीच एक या जलमहल वास्तुची पुरातत्व विभागाने नोंद घेऊन त्याचे संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीने कार्य करण्याची गरज आहे. तसेच सदर परीसर निसर्गरम्य असल्याने ऐतिहासिक व निसर्गरम्य अशा पध्दतीचे चंद्रपूर शहरानजिक चांगले पर्यटन स्थळ विकसीत करता येईल. सदर मागणीचे निवेदन श्री हंसराज अहीर, के्रद्रीय गृह राज्यमंत्री व श्री सुधिरभाऊ मुनगंटीवार, मंत्री, अर्थ नियोजन व वने तथा पालकमंत्री यांना देण्यात आलेले आहे. नुकतेच चंद्रपुर किल्ला-परकोट व शहरातील ऐतिहासिक वास्तु संवर्धनाच्या अनुषंगाने ना. अहिर यांच्या पुढाकारातुन दिल्ली येथे पार पडलेल्या या खात्याचे मंत्री व अधिकारी यांच्या बैठकीत सुध्दा या विषयी माहीती मांडण्यात आलेली होती.

काय आहे ‘जलमहल’ चा इतिहास
चंद्रपूर राज्यांची स्थापना होण्यापुर्वी म्हणजे 500 वर्षापुर्वी गोंडराज्याची धुरा बल्लारपुरहुन सांभाळली जायची तत्कालिन गोंडराजे खांडक्या बल्लाळशहा (इ.स.1472 ते 1497) यांचे काळात ‘जुनोना तलाव’ व तलावाच्या काठावरिल ‘जलमहल’ चे बांधकाम करण्यात आले होते.
खांडक्या बल्लाळशहा याची प्रकृती लहानपणापासुन निरोगी नव्हती. त्यांना सर्व शरिरावर खांडके असल्याने त्याची प्रकृती नेहमीच खालावलेली असायची. त्यांची प्रकृती सुधारणेसाठी राणी हिताराणी हिने जुनोनाच्या जंगलात जुनोना तलाव बांधुन त्याचे काठावर ‘जलमहल’ बांधले. वर्षातिल काही महीने गोंडराजे खांडक्या बल्लाळशहा या जलमहल मध्ये राहत असत. राणी हिताराणी हिने प्रकृती सुधारावी म्हणुन मोकळया हवेत राहता यावे, शिकारीचा छंद सुध्दा लावला. यानंतर गोंडराजे यांनी आपली राजधानी चंद्रपूरला हलविल्यानंतर जुनोना येथील ‘जलमहल’ चा फारसा संदर्भ इतिहासात येत नाही. मात्र अजुनही सदर परिसर आणी जलमहल सुस्थितीत आहे. पुर्वी येथे खाजगी रिसोर्ट झाल्यानंतर पर्यटकांना यायची संधी निर्माण झाली होती. या जलमहल च्या आतील तळघर व त्याची दरवाजे बंद करण्यात आलेली होती. आता मात्र या जलमहल ची स्वच्छता करण्यात रस्ते खुले करण्यात आल्यास आजही हे ‘जलमहल’ गोंडकालीन ऐतिहासिक वारसा पर्यटकांना आकर्षीत करू शकते. कारण, जुनोना तलावाचे विहगंम दृष्य आणी घनदाट वनराई यामुळे या परिसराचे सोदर्य आणखीणच खुलुन येते.
जंगल, तलाव आणी ऐतिहासीक गोंडकालीन ‘जलमहल’ यांची योग्य सांगड घातल्यास चंद्रपूर शहरानजीक निसर्गरम्य असे पर्यटन केंद्र तयार होऊ शकते. सदर गोंडकालीन ऐतिहासिक वारसा 500 वर्ष प्राचीन असुन ब्रिटीशकाळात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या यादीत इ.स. 1920-21 दरम्यान नोंद घेण्यात आली असतांना सुध्दा नंतरच्या काळात यादीतुन वगळयात आले होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.