ऑनलाईन औषधी विक्रीबाबत औषधी विक्रेते आक्रमक
शुक्रवारला ऑनलाईन फार्मसी विरोधात औषध विक्रेत्यांनी देशव्यापी बंद आंदोलन पुकारन्यात आले होते. या अनुषंगाने कोरपना तालुक्यातील कोरपना,गड़चांदुर,नान्दा,
वनसडी,पारडी,कवठाळा येथिल सर्व औषध विक्रेत्यानी मेडिकल बंद ठेऊन बंद यशस्वीरित्या पाळला. यासंबंधी केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी तहसिलदार आणि ठाणेदार यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत शासनास निवेदन सादर केले.
यामधे ई-फार्मसीला अधिकृत मान्यता देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने नुकताच ई-फार्मसीचा अंतिम मसुदा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार ई-फार्मसीवर शिक्कामोर्तब झालं आहे. या ऑनलाईन औषधी खरेदीमुळे औषध विक्रेत्यांचे व्यावसायिक नुकसान तर होणार आहे.शिवाय आनलाइन औषधी विक्रीमुळे नशेच्या तसेच प्रतिबन्धित औषधी सहज प्राप्त करता येणार आहे. तसेच यातून चुकीची औषधं दिली जाण्याची शक्यता नकारता येत नाही याद्वारे रूग्णांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची चिन्हे आहे. याबाबत शासनाने नागरिकांचे हित लक्षात घेवून ऑनलाईन औषधीच्या विक्रीला परवानगी नाकारावी अशी मागणी निवेदनात कऱण्यात आली आहे.तहसीलदार व ठाणेदार कोरपना याना निवेदन देतेवेळी कोरपना तालुका केमिस्ट अण्ड ड्रगिस्ट असोशियनचे अद्यक्ष पराग जकाते,सचिव विनोद चटप , जेष्ठ केमिस्ट.दिलीप जेनेकर ,सुरेश माहुरे,सुरेश कपले,अजय मुनगिलवार,सतीश डाहुले,सुरेन्द्र ठवसे,दिवाकर कवरासे,नीलेश ताजने,नितिन डोर्लिकर,दिवाकर वडस्कर,ईश्वर खनके,राहुल राजुरकर व कोरपना तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधव उपस्थित होते.