चंद्रपूर/प्रतिनिधी:
असामान्य व्यक्तिमत्त्व आणि त्याला कर्तृत्वाची जोड दिल्यामुळेच बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांचे कार्य व कर्तृत्व देशपातळीवर पोहोचले आहे. सर्वसमावेशक वृत्तीमुळे त्यांनी चंद्रपूरचा नावलौकिक देश पातळीवर वाढविले. त्याचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.मंगळवारी बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ुबॅरि. राजाभाऊ खोबरागडे मेमोरियल चंद्रपूर व खोबरागडे परिवारातर्फे स्थानिक बॅरि. राजाभाऊ खोबरागडे चौकातील बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांच्या पुतळ्याला मालार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. आली. त्यानंतर खोबरागडे भवन येथे बुद्ध-धम्म-संघ वंदना घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, काँग्रेस नेते राहुल पुगलिया, मनपाचे उपमहापौर अनिल फुलझेले, रिपब्लिकन नेते प्रविण खोबरागडे, नगरसेवक राहुल घोटेकर, सतीश घोडमोडे, नगरसेविका सविता कांबळे, आदी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री अहीर पुढे म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी बॅ. खोबरागडे यांनी आपले कर्तृत्व पणाला लावले. खऱ्या अथार्ने ते बाबासाहेबांचे सहकारी आणि असामान्य उंचीचे नेते होते. डॉ. बाबासाहेबांच्या पश्चात त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याला वाहून घेतांना त्यांनी संगठकांची भूमिका उत्तम वठवल्याने त्यांना देशपातळीवर सन्मान प्राप्त झाला. अशा या महान नेत्यांचे विचार समता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी अंगिकारावे, असे ते म्हणाले. याप्रसंगी उपस्थितांनी अभिवादन केले. त्यानंतर हेमंत शेंडे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला.
बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या सर्वसमावेशक वृत्तीमुळे
देशपातळीवर चंद्रपूरचे नावलौकीक : ना. हंसराज अहीर
चंद्रपूर प्रातिनिधी:
असामान्य व्यक्तीमत्व आणि त्याला कतृत्वाची जोड दिल्यामुळेच बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांचे कार्य व कर्तृत्व देशपातळीवर पोहचले. सर्व समावेशक वृत्तीमुळे त्यांनी चंद्रपूरचा नावलौकीक देश पातळीवर वाढविला असे उद्गार केन्द्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी काढले.
चंद्रपूर येथे दिनांक 25 सप्टेंबर रोजी बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या 93 व्या जयंती निमित्य स्थानिक बॅ. राजाभाऊ खोब्रागडे चैकातील बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळîायांला माल्यार्पण करूण आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी चंद्रपूर मनपाचे उपमहापौर अनिल फुलझेले, नगरसेवक राहुल घोटेकर, सतीश घोडमोडे, नगरसेविका सविता कांबळे, शितल गुरूनुले, देशक खोब्रागडे, प्रा. ईसादास भडके, रवि गुरूनुले, किशोर बावणे, स्वप्नील कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्राी अहीर पुढे म्हणाले की, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांनी आपले कर्तृत्व पणाला लावले. खऱ्या अर्थाने ते बाबासाहेबांचे सहकारी आणि असामान्य उंचीचे नेते होते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कर्तृत्वाला नमन करतांना समरसतेचा विचार पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरजही केंद्रीय राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी बोलून दाखविली.
डाॅ. बाबासाहेबांच्या पश्चात त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याला वाहुन घेतांना त्यांनी संगठकाची भुमिका उत्तम वठवल्याने त्यांना देशपातळीवर सन्मान प्राप्त झाला. राज्यसभेचे उपसभापती विराजमान होण्याचा बहुमान मिळवून देशाच्या सांसदीय लोकशाहीत त्यांनी आपले फार मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्याचे, कर्तृत्वाचे नेहमी स्मरण राखावे लागेल असे सांगत बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांचा वैचारीक वारसा आपल्याला उपयोगी ठरेल, त्यांच्या विचाराचे अनुकरण करण्यासाठी आपण सार्वांनी पुढे आले पाहिजे असेही त्यांनी या वेळी सांगितले.
बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या महान कर्तुत्वाला नमन
भाजप नगरसेवकांकडून सिद्धार्थ विद्यालयातील वस्तीगृहाला १५ हजारांची मदत
चंद्रपूर/प्रतिनिधी:
बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्य भाजप नगरसेवकांकडून स्थानिक सिद्धार्थ विद्यालयातील वस्तीगृह परिसरात वृक्ष लावण्यात आले. येथील मुलांना झोपण्याकरिता गादी उपलब्ध करण्याकरिता १५ हजारांची मदत करण्यात आली. याप्रसंगी जयंतीनिमित्त त्यांच्या महान कर्तृत्वाला नमन करतांना समरसतेचा विचार पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरजही आल्याचे मत याप्रसंगी मान्यवरांनी व्येक्ती केले.
चंद्रपूर येथे दिनांक 25 सप्टेंबर रोजी बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या 93 व्या जयंती निमित्य स्थानिक बॅ. राजाभाऊ खोब्रागडे चैकातील बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करूण आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी चंद्रपूर मनपाचे नगरसेविका सविता कांबळे, वंदना जांभूळकर, शीतल गुरनुले, जयश्री जुमडे, पुष्पा उराडे, ताराबाई मेश्राम, अर्चना नाईक, नगरसेवक राहूल घोटेकर, सतीश घोनमोडे, श्याम कनकंम, रवी गुरनुले, अमोल नगराळे, प्रदीप किरमे, प्रसाद शेटे, धम्मप्रकाश भस्मे,स्वप्नील कांबळे, प्रवीण पुनवटकर, संदीप शेन्डे, सुरेश अडपेवार यांची उपस्थिती होती. या प्रसंगी सर्व मान्यवरांनी आपली मते व्येक्त केली.