সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, September 29, 2018

नागपूर पोलिसांची बॉलीवूड स्टाईल जनजागृती;मिम्स पे चर्चा

नागपूर/ललित लांजेवार:
नागपूरकरांमध्ये वाहतूक जागृती करायची तर नागपूरकरांच्या पद्धतीनेच त्यांना समजावायला हवे. त्यासाठी नागपूर पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली असून शहरातील विविध चौकात वाहतूकीच्या नियमांबाबत जनजागृती करणारे बॉलीवूड स्टाईल अंदाजात जनजागृतीपर अंदाजात फ्लेक्स लावण्यात आले आहे.

दिवसेंदिवस नागपूरची वाढती वाहनांची संख्या व नियमांचे पालन न केल्याने अपघातात होणारी वाढ रोखण्यासाठी नागपूर पोलीस त्यांच्या अनोख्या सध्या जनजागृतीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. नागपूर पोलिसांची चर्चा व्हायलाच पाहिजे त्याला कारणही तसेच आहे.नागपूरकरांमध्ये वाहतूक जागृती करायची तर नागपूरकरांच्या पद्धतीनेच त्यांना समजावायला हवे. 

त्यासाठी नागपूर पोलिसांनी अमिताभ बच्चन यांचा कोण बनेगा करोडपती, १९७५ साली प्रदर्शित झालेला भारतामधील हिंदी भाषिक चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मानला गेलेला चित्रपट शोले,सलमान खान,अमीर खान,अमरीश पुरी, बोमन इराणी,यांच्या सह फिल्म इंडस्ट्री मधील अनेक चित्रपटांच्या मनावर कोरणाऱ्या डॉयलॉगचा वापर करत जनजागृती करत आहेत, तर सोशल मिडीयावर या जनजागृतीचे मिम्स देखील व्हायरल केले आहे.



विना हेल्मेट गाडी चालवणे,ट्रिपल सीट वाहन चालवणे,अवैध प्रवासी वाहतूक, राँग साईड ड्रायव्हिंग, फॅन्सी नंबर,सिटबेल्ट न लावता वाहन चालविणे, अश्या आशयाचे बॉलीवूड इंडस्ट्रीमधील फोटो व डॉयलॉग वापरून नागपूर पोलीस नागपूरकरांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. नागपूर पोलिस सोशल मिडिया वरून फेसबुक व ट्वीटरच्या माध्यमातून हि जनजागृती तर करतच आहेत.

 सोबतच शहरातील चौकाचौकात फ्लेक्सच्या माध्यमातून देखील हि जनजागृती करत आहे.सध्या असे अनेक मिम सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकजण ह्या ट्वीटकडे उत्सुकतेने पाहत आहेत. तर अशा प्रकारचे ट्वीट विनोदी ढंगाने करून नागरिकांपर्यंत पोहचवत असते त्यात ह्या ट्वीटवरून नागपूर पोलीस हेल्मेट संदर्भात जनजागृती करत आहे.

पोलिसांच्या अश्या नवीन संकल्पनेसह जरी जनजागृती जरी सुरु असली तरी मात्र शहरात अनेक ठिकाणी मोठ मोठ्या आवाजाच्या गाड्या कर्ण कर्कश आवाजाचे हॉर्न,व दुचाकीने गाडी हवेत उडविण्याचे प्रकार हे मोठ्या प्रमाणवर सुरूच आहे. अश्या या प्रकाराला पोलिसांनी लवकरात लवकर आळा घालणे गरजेचे आहे,


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.