25 हजार रुपये दंड
पोलीस स्टेशन भिसी अंतर्गत हिरापुर येथे अवैध दारूची वाहतुक करून विक्री करणाऱ्या आरोपीस 19/09/2018 रोजी श्री. छल्लानी, न्यायदंडाधिकारी कोर्ट चिमुर, जि.चंद्रपुर यांनी शिक्षा ठोठावली.
दिनांक 05/09/2015 रोजी भिसी अंतर्गत शंकरपुर चौकी येथील पाेलीसांना गापनीय माहिती मिळाल्यावरून अवैधरित्या दारूची तस्करी करीत असतणाऱ्या दोन आरोपी नामे आषिश रामराव नैताम रा. पेंढरी ता. सिंदेवाही,(राजु नामदेव मडावी रा.नवरगाव ता. सिंदेवाही यांना दारूच्या मुद्दे मालासह अटक करण्यात आले. यावरून पोलीस स्टेशन भिसी येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस
हवा. बद्दारखॉं पठाण आणि पा. रामचंद्र चाफले यांनी पुर्ण करून आरोपी विरूद्ध सबळ पुराव्यानिषी न्यायालयात दोशारोपपत्र सादर केले.न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक 19/09/2018 रोजी आशिष रामराव नैताम रा. पेंढरी ता. सिंदेवाही राजु नामदेव मडावी रा. नवरगाव ता.सिंदेवाही यांना 3 वर्श सश्रम कारावासीची शिक्षा व 25,000/-रू दंड, न भरल्यास 6 महिने कारवासाची शिक्षा श्री.छल्लानी, न्यायदंडाधिकारी कोर्ट चिमुर, जि. चंद्रपुर यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणामध्ये सरकार तर्फे अॅड. श्री. संजय ठावरी, सरकारी अभियोक्ता, चंद्रपूर यांनी काम पाहीले असुन कोर्ट पैरवी म्हणुन सफौ. सुधाकर बुटके पोस्टे. चिमुर, यांनी काम पाहिले.