हंसराज अहिर यांची केंद्रीय मंत्री डाॅ. महेश शर्मा यांचे सोबत सकारात्मक चर्चा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुर चा ऐतिहासिक वारसा जतन करण्यास केंद्र सरकार गंभीर असून ना. हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने केंद्रीय सांस्कृतीक व पर्यटन मंत्राी डाॅ. महेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय पुरातत्व विभागाचे केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. चंद्रपुर मधील ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्यास नागरिकांचा पुढाकार उल्लेखनीय असून सरकार सर्वोतोपरी सहकार्य करणार असे आश्वासन ना. डाॅ. महेश शर्मा यांनी दिले.
चंद्रपुर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाची ठरलेल्या या बैठकीत चंद्रपुर किल्ला परकोट, गोंडराजे समाधी स्थळ सौंदर्यीकरण, ऐतिहासिक गोंडराजे राजमहल सद्याचे जिल्हा कारागृह, सराय इमारत, रामाळा तलाव, पुरातत्व विभागाचे संग्रहालय, जूनोना जलमहल, भद्रावती विजासन लेणी, संसद आदर्श ग्राम चंदनखेड़ा येथील किल्ला आदि विषयावर सकारात्मक निर्णय झाले.

विशेषतः चंद्रपुर मधील गोंड़कालीन ऐतिहासिक वारसा संवर्धन करिता या महत्वपूर्ण बैठकीस ना. हंसराज अहीर यांचेसह सांस्कृतिक पर्यटन मंत्राी डाॅ. महेश शर्मा, खात्याचे सचिव, भारतीय पुरातत्व विभाग च्या महानिदेशक डाॅ. उषा शर्मा, इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे, बिमल शहा, जानबीज शर्मा, जाॅइंट डायरेक्टर, टी जे अलोने, निदेशक, स्मारक, नागपुर सर्कल पुरातत्व अधीक्षक डाॅ. इजराइल हाशमी, प्रशांत शिंदे उपस्थित होते.