सीसिटीव्हीत प्रकार दिसताच नम्रताने विनम्रपूर्वक दिली कबुली
नागपूर/प्रतिनिधी:
- एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आलेले झोन पाचचे पोलिस उपायुक्त हर्ष पोद्दार यांची अंगठी चोरीला गेली. ही घटना धंतोली ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेची पोलिसांनी लगेच दखल घेत सीसीटिव्ही च्या मदतीने रुग्णालयातील महिला कर्मचाºयास अटक करुन अंगठी ताब्यात घेतली.
हर्ष पोद्दार मंगळवारी रात्री ७.३० वाजता धंतोली पोालस ठाणे हद्दीतील प्रिसिजन हॉस्पिटलमध्ये एमआरआय तपासणीसाठी आले होते. अंगठी गायब झाल्याने रुग्णालयात खळबळ उडाली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. सीसीटीव्हीमध्ये रुग्णालयातील कर्मचारी नम्रता गौतम बन्सोडे अंगठी चोरतांना दिसून आली. पोलिसांनी बुधवारी सकाळी नम्रताला ताब्यात घेऊन विचारपूस केली. तेव्हा तिने चोरीची कबुली दिली.