प्रतिनिधी/कारंजा (घाडगे):
श्री. संत भाकरे महाराज संस्थान कारंजा येथील अनेक दिवसापासून अर्धवट स्थितीत असलेले सभागृहाचे काम पुर्णत्वास नेण्याच्या दृष्टीकोनातून आ. अमरभाऊ काळे, आर्वी विधानसभा यांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री व राज्यसभा खासदार पी. चिदंबरम यांचे निधीतून २५ लक्ष रुपये मंजूर करवून कार्य पुर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण कार्य केलेले आहे त्याचप्रमाणे ग्रामदैवत श्री. संत लटारे महाराज देवस्थान, वॉर्ड क्र. ८ येथे मंदिरात जाणेकरिता सिमेंट रस्ता व पायऱ्यांची मागणी भक्तांकडून अनेक वर्षपासून होती ती सुद्धा आमदार यांचे स्थानिक विकास निधीतून मंजूर करण्यात आला व या दोन्ही कामांचे भूमिपूजन मा. आ. अमरभाऊ काळे यांचे हस्ते व नगरपंचायत नगराध्यक्षा सौ. कल्पना मस्के, उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर, शिक्षण सभापती प्रेम महिले, बांधकाम सभापती नरेश चाफले, भाकरे महाराज संस्थान अध्यक्ष अशोक पालिवाल, लटारे महाराज संस्थान चे कोषाध्यक्ष बकुल जसानी, दोन्ही संस्थेचे पदाधिकारी तसेच काँग्रेसचे जेष्ठय दिगांबर चोपडे, उत्तम नारिंगे, मुन्ना जैस्वाल, नगरसेवक संजय कदम, व कैलास अग्रवाल , दिलीप राठी , नामदेवराव ढोबाळे , चंदू भांगे , गोपाल कलोकर सर्व सद्गुरू भक्तांची उपस्थिती होती.