रक्तादानामुळेे अनेकांना जीवनदान मिळाले, हे सर्वाना कळत असेल तरी यासाठी मोजकेच लोक समोर येेेत असतात स्वत: रक्तदान करुन इतरांना रक्तदान करण्यास प्रवृत्त करणारे बोटावर मोजन्या इतके आहेेेत.
त्यात धंतोली तांडा येथील चिमूल्य विद्यार्थ्यांनी भर टाकत रॅली काढून रक्तदानाचा संदेश गावभर दिला.
रक्तदान ही आज काळाची गरज बनली आहे. रोज कुणाला ना कुणाला रक्त हवे असते तरी देखील नागरिक रक्तदान करण्यास दिरंगाई किंवा टाळाटाळ करतात. त्यामुळे रक्ताची अत्यंत गरज भासत आहेत. हे गावातील युवकाचा लक्षात येताच त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले मात्र रक्तदानाचा संदेश युवका पर्यन्त कोणत्या माध्यमातून पोहोचवायचा. ही गोस्ट शिक्षकाला कळताच त्यांनी "रक्तदान हेच जीवनदान" घोषवाक्य देत विद्यार्थ्यांची रॅली काढून जनजागृती करण्यत आली. तसेच रक्तदानाचे महत्व सुद्धा त्यांनी पटवून दिले.
यावेळी संत सेवालाल मंडळा मार्फत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा हाकेला साथ देत गावतील तरूण मंडळी धावून आली व तांडा सारख्या वस्ती मध्ये पहिल्यांदाच 20 युवकांनी रक्तदान केले..
सदर कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रल्हाद पवार,ओम पवार,सरपंच विजयजी रणदिवे नारायण राठोड, सुपडा वानखेडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, मंडळातील सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेत रक्तदान शिबिरास परिश्रम घेतले तसेच रक्तपेढी चंद्रपूर यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.