10 ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळ विस्तार
कुणाची पङणार विकेट; कुणाला मिळणार बाप्पाचा प्रसाद
⚡ सध्या भाजप शिवसेनामधील मंत्री वाटपानुसार आणि दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे भाजपाच्या एकूण चार मंत्रिपदाच्या जागा रिक्त
शिवसेनेचा 12 मंत्र्यांचा कोटा आधीच पूर्ण, आता भाजप त्यांच्या कोट्यातील चार जागा भरणार का? याकडे सर्वांचे लक्ष...
एकनाथ खडसे यांचे कमबॅक अजूनही गुलदस्त्यात, कृषीमंत्री पद हे चंद्रकांत पाटील यांच्याकडेच राहण्याची शक्यता...
आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे-पाटील यांचे स्थान धोक्यात येण्याची शक्यता...
राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुढील आठवड्यात प्रत्येक खात्याचा मुख्यमंत्री आढावा घेणार, यानंतर मंत्रिपद बदलाबद्दल संबंधितांना सांगितले जाणार...