সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, September 05, 2018

डाॅ. गजानन होले काळाच्या पडद्याआड

अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नाशिकमध्ये उत्तम कामगिरी !

वर्धा-आष्टी (शहीद)-:* क्रातिभूमी आष्टी (शहीद) येथील क्रांतिवीरांच्या कुटुंबात जन्माला आलेले नाशिकचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.गजानन होले यांचा शनिवार दि.१ सप्टेंबर रोजी कर्करोगाने नाशिक येथील खाजगी रूग्णालयात मृत्यू झाला. यावेळी आष्टीकर आणि नाशिक जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र दुःखाने व्यथित झाले. डाॅ.होले यांचा मृत्यू सर्वसामान्य जनतेच्या मनाला चटका लावून गेला.

वडील आणि काका यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत शिलेदार म्हणून आष्टीच्या तिरंगा क्रांतीत आपले मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कामगिरीमुळे ताम्रपत्र देवून त्यांना शासनाने सन्मानित केले आहे. डाॅ. गजाजन त्यापैकी मारोतरावजी होले यांचे धाकटे चिरंजीव आहे.

नागपूर येथून १९८६ ला वैद्यकीय क्षेत्रातील एम.बी.बी.एस पदवी संपादन केल्यानंतर डाॅ. गजाजन यांनी आष्टी तालुक्यामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काही वर्षं सेवा दिल्यानंतर मुंबईहून एम. एस. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मुंबई, दिंडोरी येथील जिल्हा रूग्णालयात सेवा दिल्यानंतर त्यांची २०१३ ला नाशिक येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून नियुक्ती झाली. नाशिककरांची त्यांनी अहोरात्र सेवा केली. प्रशासकीय सेवेत त्यांचा नावलौकिक होता. नाशिककरांच्या मनात त्यांच्याविषयी मानाचे स्थान होते.

कर्करोगाने पिडीत असलेले डाॅ. होले अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने नाशिककर तथा आष्टीकरांच्या भावनांना बांध फुटले. उत्तम कार्य आणि प्रभावी, मनमिळाऊ स्वभावाचे धनी असलेल्या डाॅ. होले यांच्या अकस्मात मृत्यू झाल्याने सर्वीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वांनाच दुःख झालेले आहे. त्यांचा अंत्यविधी नाशिक येथील मोक्षधामावर करण्यात आला आहे.


डाॅ. गजाजन होले यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार असून हुतात्मा स्मारक समितीचे विद्यमान संचालक विनायकराव होले त्यांचे जेष्ठ बंधू आहे. विदर्भपुत्र(अम.) निवृत्त ब्रिगेडीयर संजयराव होले हे सुद्धा त्याचे जेष्ठ चुलत बंधू आहेत. विवाहित मुलगी, जावई, मुलगा आणि कौटुंबिक आप्तगण आण मित्रपरिवार शोकाकुल असून ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या एका उमद्या मनाच्या व्यक्तिमत्वाला आष्टीकर मुकले आहे.श्रद्धांजली वाहून सर्वीकडे या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.विरेंद्र कडू यांनी सुद्धा श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त केला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.