नागपूर/प्रतिनिधी:-
महावितरणच्या वसुली पथकावर राज्यातील एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करण्यात आले. वीजबिलाची वसुली करण्यासाठी महावितरणाचे कर्मचारी गेले असताना थकबाकीदारांनी हे कृत्य केले.पहिली घटना वर्धा तर दुसरी घटना भंडारा येथे घडली आहे.
थकबाकीदाराच्या घरी महावितरणची वसुली पथक गेले असता थकबाकीदारांनी महावितरणच्या वसूल पथकावर हल्ला केला यात महावितरण डी सी 2 वर्धा शहर चे लाईनमन श्री दीपक जत्रे वय 35 याना वीज बिल वसुली करत असताना शिंदे मेघे येथे वीज ग्राहकाकडून जीव घेणा हल्ला चढवत जबर मारहाण केली तर भंडारा येथील संदीप मंगरे व कार्तिक भोयर हे दोन्ही महावितरणचे कर्मचारी थकबाकीची रक्कमेबाबद विचारपूस करण्यासाठी गेले असता अमर प्रभाकर लांजेवार व प्रभाकर महादेव लांजेवार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला,या हल्यात वितरणचे कर्मचारी गंभीर रित्या जखमी झाले ,त्यांना तत्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले.
या दोन्ही घटना झाल्याची तक्रार महावितरणने संबंधित हद्दीतील पोलीस स्टेशनमध्ये केली असून त्यांच्यावर कलम 353,कलम 332, कलम 333,कलम 506,कलम 326,कलम 504, कलम 34, अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.