गोंडखैरीत सेक्स डान्स (देह व्यापार) रैकेटचा पर्दाफास
नागपूर ग्रामीण पोलीसांच्या गुन्हे शाखेची धाड
गोंडखैरीत अवैद्य धंद्याला ऊत
कळमेश्वर तालुक्यातील कळमेश्वर थानाअंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर असलेले गोंडखैरी येथे सतत अवैधरीत्या धंद्याला ऊत येत असून नाग.ग्रा.अधिक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्वात डिवायएसपी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेच्या पथकासह कळमेश्वरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर बहादूरे यांनी गोंडखैरी येथे अवैद्य सेक्स डान्स रैकेटचा केला पर्दाफास. कलम ४,२५ कोट्टा अँक्ट कायदा नुसार ताब्यात घेण्यात आले.
गोंडखैरी येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरीत्या धंद्याला ऊत आला असून असेच सेक्स डान्स रैकेटवर धाड मारुन तरुण- तरुणींना ताब्यात घेण्यात आले.अशातच गेल्या काही दिवसात राष्ट्रीय महामार्गावरील टी पाँईट येथे होटल वंडर्स अॉफ वर्ड, अँट्स मस पिअर्स, स्काय गार्डन रेस्टॉरेन्ट होटल येथे अवैधरीत्या चालु असलेल्या हुक्का पार्लरवर धाड टाकुन मालकासह तरुण तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते.
गोंडखैरी येथे शनिवार (१५/सप्टेंबर) मध्यरात्री १.१५ वाजता गोंडखैरी शिवारात गौरव अत्करी व रामकृष्ण मारवाडी यांनी दारु जुगार, अवैधरीत्या (देह व्यापार) सेक्स डान्स रैकेट चा गोरख धंद्याला सुरवात केली. त्यांना वारंवार कळमेश्वर थानेदार चंद्रशेखर बहादूरे यांनी सुचना देऊनही अवैद्य धंद्याला माज येऊन शेवटी माहीती मिळताच रैकेटवर धाड टाकुन रंगे हात पकडण्यात आले. हुक्का पार्लर, पैशे मोजमाप मशिन, मोबाईल, चारचाकी वाहन तरुण तरुणींना यावेळी ताब्यात घेऊन कळमेश्वर पोलीस थाण्यात जमा करण्यात आले.
कलम ४,२५ कोट्टा अँक्ट कायद्यानुसार अटकेतील नावे मोरेश्वर सुरेश मेश्राम वय ३४ पारडी, नागपूर, ललीतसिंग उदयसिंग वय १८ हिंगणा, प्रदिप देविदास गणविर वय २१ कामठी, अजीज गुलाबखाँन पठान वय ३२ कामठी, राहुल शैलेंद्र डहाटे वय २० हिंगणा, नितेश गोविंदराव माहुरे, वय २० हिंगणा, तरुणीं.. रिया दिपक मोदनवा वय २४ इल्हाबाद, पुजा शिवकुमार पाल वय २३ सोलापूर, हेमलता अशोक कुमावत वय २६ सोलापूर, उज्वला मोरेश्वर मेश्राम वय ३५ पारडी, मोहनी अखंड प्रतापसिंग ठाकुर वय २३ नागपूर, श्रध्दा केशरवानी वय २२ पारडी नागपूर, अश्विनी राजू बावरीया वय २६ नागपूर, ताई सुदर्शन बागडे वय ५५ नागपूर यांना रात्री घटनास्थळावरुन अटक करून सकाळी सुचनापत्राच्या आधारे त्यांना सोडण्यात आले.अशी पोलीस सुत्रानुसार प्राप्त माहीती मिळाली. पुढील तपास नाग.ग्रा.पोलीस अधिक्षक राकेश आला यांच्या नेतृत्वात कळमेश्वर पोलीस निरिक्षक चंद्रशेखर बहादूरे अधीक तपास करीत आहे.