नागपूर/ऑनलाईन काव्यशिल्प:
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' या आगामी सिनेमाच्या शूटिंगला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन तब्बल दीड महिना विदर्भात तळ ठोकणार आहेत.
या सिनेमाचं 40 ते 45 दिवसांचं शूटिंग नागपुरात होणार आहे. नागपूरच्या सेंट जॉन शाळेच्या आवारात ह्या सिनेमाचा सेट उभारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन तब्बल दीड महिना नागपुरात राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
'ठग्ज ऑफ हिंदुस्थान', कौन बनेगा करोडपती यासारखे प्रोजेक्ट संपल्यानंतर बिग बीनं आपल्या तारखा 'झुंड' सिनेमासाठी दिल्या आहेत.