चंद्रपूर- सिंदेवाही तालुक्यातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम यास दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेडाम यांनी एका रेतिघाट कंत्राटदाराकडे रेतिघाट चालू देण्यासाठी 2 लाखांच्या लाचेची मागणी केली होती. कंत्राटदाराने याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. पैसे स्वीकारत असतानात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गेडाम यांना रंगेहाथ पकडले. चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे गेडाम यांच्या मातोश्री मोहिनी गेडाम या सिंदेवाही नगरपंचायतच्या भाजपच्या नगराध्यक्षा आहेत.झेडपी मेम्बरने घेतली दोन लाख रुपयांची लाच
चंद्रपूर- सिंदेवाही तालुक्यातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम यास दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेडाम यांनी एका रेतिघाट कंत्राटदाराकडे रेतिघाट चालू देण्यासाठी 2 लाखांच्या लाचेची मागणी केली होती. कंत्राटदाराने याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. पैसे स्वीकारत असतानात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गेडाम यांना रंगेहाथ पकडले. चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे गेडाम यांच्या मातोश्री मोहिनी गेडाम या सिंदेवाही नगरपंचायतच्या भाजपच्या नगराध्यक्षा आहेत.

