সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, September 20, 2018

उत्कृष्ट गणेश मंडळांना पारोतोषिक

चंद्रपूर/प्रतिनिधी:
ज्या प्रमाणे पोलीस आपल्या भावनांना आवर घालत केवळ समाजाच्या सेवेत प्रत्येक उत्सवादरम्यान कार्यरत असतो त्याचप्रमाणे येत्या गणेश विर्सजन उत्सहाच्या वेळी पोलीस मित्रांनी सुध्दा त्याच निष्ठेने व आत्मयतेने इतरांचा आनंद व्दिगुनीत होण्याकरीता पोलीसांसाबेत उभे राहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. महेष्वर रेड्डी यांनी पोलीस मुख्यालय येथे सपंन्न झालेल्या पोलीस मित्र बैठकी दरम्यान केले. सदर पोलीस मित्र बैठकी करीता संपुर्ण चंद्रपूर जिल्हयातील मोठया संख्येने पोलीस मित्र एकत्र आलेले होते. आगामी गणेश उत्सव विसर्जन बंदोबस्त
संबंधाने सदरची बैठक डॉ. श्री. कुणाल खेमणार जिल्हयाधिकारी चंद्रपुर आणि डॉ. श्री. महेष्वर रेड्डी पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. येत्या गणेश विसर्जन बंदोबस्त वेळी हे पोलीस मित्र पोलीसांच्या खांदयाला खांदा लावुन कार्य करणार आहेत. त्याकरीता त्यांना पोलीस मित्र ओळख म्हणुन एक टीशर्ट , एक कॅप आणि एक व्हिसल जिल्हाधिकारी चंद्रपुर व पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी पोलीस मित्र यांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्री. महेष्वर रेड्डी हे म्हणाले की, टिळकांच्या स्वप्नातील गणेश उत्सव हा भक्तिरसाने सजलला उत्सव आहे. पोलीस मित्रांचे मनोबल वाढवित पोलीस अधीक्षक यांनी निस्वार्थपणे समाजाच्या सेवेत दाखल झाल्या बद्दल उपस्थित पोलीस मित्रांचे अभिनदंन केले. 

अध्यक्षीय भाषणाद्वारे जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी चंद्रपुर जिल्हयातील सामजीक एकोप्याचे कौतुक करून आगामी उत्सवात देखील हा सामाजीक एकोपा असाच कायम राहील अशी उपस्थितांकडुन अपेक्षा व्यक्त केली. तसचे बहुतांश पोलीस मित्र वर्ग हा युवा असल्याचे निदर्शनात आणुन युवा वर्गाद्वारेच भविश्य बदलविणे शक्य होते त्या दृश्टीने प्रत्येक युवकाने सामाजीक बांधीलकी जापासत समाजाप्रति आपले कर्तव्य चोख बजवावे असे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान सन 2017 मधील उत्कृष्ट गणेश मंडळांना पारोतोषिके प्रदान करण्यात आले . यामध्ये निवडुन आलेल्या गणेश मंडळांना सिसीटीव्ही कॅमद्वारे देण्यात आले . यामध्येच चंद्रपूर उपविभागामधुन अर्थव गणेश मंडळ, आकाशवाणी चंद्रपूर यांना प्रथम, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ उर्जानगर चंद्रपूर यांना द्वितीय तर जयहिंद गणेश मंडळ, 
बालाजी वार्ड चंद्रपूर यांना तृतीय पारोतोषिक देण्यात आले. या व्यतीरिक्त पोलीस उपविभाग वरोरा, ब्रम्हपुरी, मुल, राजुरा, गडचांदुर यामधुन सुद्धा प्रथम, द्वितीय, तृतीय यास्वरूपात पारोतोषिकांचे वितरण करण्यात आले. 
सदर पारोतोषिकांचे वितरण प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले . सदर पोलीस मित्र बैठकी मध्ये कार्यक्रामचे अध्यक्ष म्हणुन डॉ. श्री. कुणाल खेमणार जिल्हयाधिकारी चंद्रपुर आणि प्रमुख उपस्थिती डॉ. श्री. महेष्वर रेड्डी पोलीस अधीक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधीक्षक श्री. हमेराजसिंह राजपूत यांच्या सह जिल्याचे, सर्व उप विभागिय पोलीस अधीकारी चंद्रपुर जिल्हा आदी उपस्थित होते. कायर्क्रमाचे संचलन पोलीस उपनिरिक्षक श्री. विकास मुंढे यांनी केले तर आभार प्रदर्षन परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मांडवे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान पोलीस मित्रांकरीता प्रितीभोज सुध्दा आयोजन करण्यात आले होते.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.