बिबिट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू
चंद्रपुर जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दुर्दैवी अशी घटना समोर आली आहे.जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील मुरपार येथील एका ८ वर्षाचा मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.मात्र हि घटना काही वेगळ्या कारणाने घडल्याचे समोर येत आहे.साहिल सालोरकर वय 8 वर्षे असे बिबट्याने ठार केलेल्या बालकाचे नाव आहे.हा मुलगा सकाळी आई पाठोपाठ उघड्यावर शौचालयाला गेला असता त्याचेवर दबा घरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला यात त्याचा जागीच मृत्यू झाला.बिबट्याने झडप घातली व त्याला खेचत जंगलात नेले. आरडाओरडा केल्या नंतर संपूर्ण गाव गोळा झाला व जंगलात साहिल चा शोध घेतला असता तो मृत अवस्थेत आढळून आला.
महाराष्ट्राने हागणदारी मुक्तचा मोठा टप्पा पार केला आहे. यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला. महाराष्ट्रात २०१२मध्ये ५० लाख घरांत शौचालय होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये राज्यात २२ लाख शौचालये बांधली. यामुळे ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्र हागाणदारी मुक्त झाला असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
घडलेल्या या प्रकारावरून शासनाच्या योजना घराघरात कितपत पोहोचल्या आहेत याचा प्रत्यय समोर येत आहे.