रविवारी चंद्रपुरात वाज्या गाज्यात गणेश विसर्जन सुरु असतानाच दुपारी ३.२३ वाजता नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम राजेश्वर पोटदुखे निधन झाले. यांच्या निधनाची बातमी कानावर येताच चंद्रपूर येथील सार्वजनिक विसर्जनातील रांगेत लागलेल्या जय बजरंग गणेश मंडळाने आपल्या मंडळाच्या मिरवणूकित वाजत असलेला वाद्य बंद
करून मूक होऊन शांततेत गणेश विसर्जन केले. व स्व.शांताराम पोटदुखे यांना श्रद्धांजली वाहिली.हे मंडळ गिरनार चौक येथील बजरंग गणेश मंडळ असून विशेष म्हणजे या मंडळाचा कारभार हा केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या निर्देशनात चालतो. या मंडळाने तात्काळ LCD स्क्रीनवर शांताराम पोटदुखे यांचा फोटो लावत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.पोटदुखे यांनी देशाच्या राजकारणात १९८० पासून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात अधिराज्य गाजविले. या काळात त्यांनी जनतेशी कधीही नाळ तुटू दिली नाही. जनतेनेही त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. म्हणूनच १९८०-१९८४, १९८४-९८, १९८९-१९९१ व १९९१-१९९६ असे सलग चारवेळा ते चंद्रपूर लोकसभा मतदार संघात खासदार म्हणून निवडून आले.चंद्रपूरच्या राजकारणाचा दीपस्तंभ म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते.यासह अन्य मोठमोठे कामे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात चंद्रपूरकरांना करवून दिली,त्यांच्या निधनाची बातमी माहित होताच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याकडे संरक्षित असलेल्या मंडळाने वाद्याचा आवाज बंद करत स्क्रीनवर भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भाजप विचाराच्या मंडळाने ही श्रद्धांजली वाहून चंद्रपुरात सन्मानजनक राजकरणाचा पाया भक्कम केला आहे असे दिसून येत आहे.