- शासकीय विहीरी, हातपंप,नळ योजना यांचे सर्वेक्षण
- जलसुरक्षक व आरोग्यसेवक यांच्या मदतीने होणार स्वच्छता सर्वेक्षण
चंद्रपुर (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील नागरींकांना शुध्द, सुरक्षीत ,मुबलक व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, तसेच जलजन्य रोगांच्या प्रार्दुभावावर नियंत्रण ठेवले जावे यासाठी पाणी व स्वच्छता विभागामार्फत जिल्हयातील पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयातील 14971 पीण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे सर्वेक्षण वर्षातुन दोन वेळा करण्यात येते 1 एप्रील ते 30 ऐप्रील व 1 आक्टोंबर ते 31 आक्टोंबर पर्यंत करण्यात येत असते.
पिण्याचे पाणी , परिसर आणी वैयक्तीक स्वच्छता या घटकांचा आरोग्याशी संबंध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना शुध्द व स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रमामध्ये स्वच्छता सर्वेक्षणाचे महत्व अनन्यसाधारण असुन वैयक्तीक सवयी व सार्वजनीक स्वच्छता , नळ पाणी पुरवठा यंत्रणेतील तांत्रीक दोष , देखभाल व दुरुस्ती या कारणांमुळे पाणी दुषीत होते. हे दुषीत पाणी पिण्यास वापरल्याने विविध जलजन्य आजार होउ शकतात.
त्यामुळे जिल्हयातील प्राथमिक आरोग्यकेंद्राकडुन त्यांच्या कार्यक्षेत्रात असणा-या सर्व गावांतील पीण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण 1 आक्टोंबर ते 31 आक्टोंबर या कालावधीत केले केले जाणार आहे. पीण्याच्या पाण्यामध्ये आढळुन आलेले दोष नष्ट करुन साथरोगास प्रतिबंध केला जातो. पीण्याच्या पाण्याचे स्त्रोत सुरक्षीत राहावे यासाठी शुध्दीकरण व प्रयोगशाळेत पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. पाणी गुणवत्ता , सनियंत्रण व स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत शुध्द पाणी पुरवठा करणा-या ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले जाते. दुषीत पाणी पुरवठा करणा-या ग्रामपंचायतींना लाल तर पाणी स्त्रोताभोवती अस्वच्छता असलेल्या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले जाते. सलग पाच वर्ष हिरवे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींना पालकमंत्री यांच्या हस्ते चंदेरी कार्ड देउन गौरविण्यात येते.
आपल्या गावातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे याकरीता व गावात कोणताही जलजन्य आजार होउ नये कींवा साथीचे आजार पसरु नये याकरीता जलसुरक्षक यांनी गावातील प्रत्येक पीण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोतांचे सर्वेक्षण करुन घ्यावे ,पाणी नमुने गोळा करुन ते प्रयोगशाळेत पाठवावे स्त्रोत दुषीत असल्यास त्यावर उपाययोजना करता येईल. आपल्या गावातील सर्व स्त्रोतांजवळ ग्रामस्थांनी स्वच्छता पाळावी . सर्व जलसुरक्षक व आरोग्यसेवक यांनी या कामाला प्राधान्य देउन पीण्यासाठी वापरत असलेले व अयोग्य असलेल्या पाणी स्त्रोतांचे सर्वेक्षण करुन घ्यावे.
ओमप्रकाश यादव
उप मुख्य कार्यकारी अधिकारी
पाणी व स्वच्छता विभाग, जि.प.चंद्रपुर