সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, November 22, 2017

अध्यापन कौशल्य विकास कार्यशाळा


कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय

रामटेक - कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या शिक्षणशास्त्रा तथा संकीर्ण विद्याशाखेद्वारे अध्यापन कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. हया कार्यशाळेचे उद्घाटन शुक्रवार, दि. 24 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता विश्वविद्यालयाच्या रामटेक येथील मुख्यालयाच्या अतिथीगृह सभागृहात करण्यात येणार आहे. याच दिवशी विश्वविद्यालयाच्या रामटेक येथे स्थलांतरीत झालेल्या परीक्षा विभागाचे उद्घाटन कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले भूषविणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी या नात्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डाॅ. कमल सिंग आणि विशेष अतिथी म्हणून भारतीय शिक्षण मंडळाचे संघटनमंत्राी श्री. मुकुलजी कानिटकर उपस्थित राहणार आहेत. कुलसचिव डाॅ. अरविंद जोशी आणि विद्यापीठ नियोजन विकास मंडळाचे संचालक डाॅ. सी. जी. विजयकुमार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. संस्कृत विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमांमधील एक वैशिष्टयपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे बी. ए. प्रशासकीय सेवा! विश्वविद्यालयाच्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम चालविला जातो. राज्य आणि केंद्रीय स्तरावरील विविध प्रशासकीय परीक्षांची तयारी करवून घेणारा हा अभ्यासक्रम चालविणारे संस्कृत विश्वविद्यालय हे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ आहे. उत्तम प्रशासक निर्माण करण्याच्या हेतूने हा अभ्सासक्रम तयार करण्यात आला आहे. इंग्रजी, संस्कृत इ. भाषांवरील प्रभुत्व, तंत्राज्ञानाधारित कौशल्ये, प्रशासकाला आवश्यक असलेले सामान्य ज्ञान, सामाजिक शास्त्रांचे सखोल ज्ञान विद्याथ्र्याला प्राप्त व्हावे या उद्दिष्टाने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या कार्यशाळेत विश्वविद्यालयाशी संलग्नित महाविद्यालये तसेच रा. तु. म. नागपूर विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमधील जवळपास 70 प्राध्यापक सहभागी होणार आहेत. या आधुनिक तंत्राज्ञानाधारित अध्यापन कौशल्ये शिकविली जाणार असून त्याचा लाभ अधिकाधिक प्राध्यापकांनी घ्यावा यासाठी शिक्षणशास्त्रा संकायाच्या अधिष्ठाता डाॅ. ललिता चंद्रात्रो (भ्रमणध्वनी 9923409510) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.