সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, November 12, 2017

कुटुंबीयांच्या धाकामुळे बारावीतील दोन मुलींची आत्महत्या

- दोन दिवसांपूर्वी शाळेतून निघून गेल्या होत्या


नागपूर/प्रतिनिधी : मित्राला भेटण्याकरिता शाळा बुडवून निघून गेलेल्या दोन मुलींनी घरी परतल्यास आईवडील व भाऊ रागावतील, मारहाण करतील या धास्तीने दोन मुलींनी कोराडी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. मुलींनी मृत्यूपूवी एक चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्यामागचे कारण लिहून ठेवले. आशना रवींद्र रोकडे (17) रा. मार्टिननगर आणि मनीषा पटले (17) रा. जरीपटका पोलीस ठाण्याच्या मागे अशी मृत मुलींची नावे आहेत.
दोघीही जरीपटका येथील दयानंद आर्य कन्या महाविद्यालयात मुली बाराव्या वर्गात वाणिज्य शाखेत शिकत होत्या. गुरुवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी त्या निघाल्या होत्या. मात्र, शाळेत न जाता त्या शिकवणी वर्गातील मित्र निशिकांत नागपुरे याच्यासह अंबाझरी उद्यान व फुटाळा येथे गेल्या होत्या. त्या ठिकाणी आशनाला भेटण्यासाठी छिंदवाडा येथून तिच्या नात्यातील रजत नावाचा मुलगा येणार होता. मात्र, रजतची गावाकडे परीक्षा सुरू असल्याने तो नागपुरात आलाच नाही. रात्री उशीरापर्यंत आशनाने त्याची वाट बघितली. त्यामुळे त्यांना फुटाळयावर 8 वाजले. निशिकांत हा दोन्ही मुलींना घरी परतण्याची विनंती करीत होता. मात्र, तोपर्यंत मुली शाळेत न जाता फिरायला निघून गेल्याची कळले होते. त्यामुळे दोघिंनाही भीती वाटत होती. त्यामुळे दोघीही निशिकांतला परतण्यास नकार देत होत्या. त्याच्या दुचाकीने त्या रात्रभर इकडे तिकडे भटकत होत्या.
निशिकांतलाही घरी जाण्यास मज्जाव करीत होत्या. निशिकांतमुळेच आपण शाळेत न जाता फिरायला गेलो, अशी माहिती पोलिसांना देऊ, अशा शब्दात त्याला धमकावत होत्या. त्यामुळे मुलींमुळे फसल्याचे समजून तो त्यांच्यासोबत फिरत होता. त्यानंतर ते कोराडी परिसरात फिरत होते. त्याच दिवशी मुले घरी न परतल्याने मुलींच्या पालकांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर मुली आता घरी परतण्यात अर्थ उरला असून जीवनयात्रा संपविण्याची भाषा करू लागल्या. त्यामुळे निशिकांत घाबरला व त्याने आपल्या आईवडिलांशी संपर्क केला. मुलींच्याही पालकांना कळविले. मात्र, मुली परतण्याच्या तयारीत नव्हत्या. शुक्रवारी ते कोराडी तलाव परिसरात पोहोचल्या. मुलींनी आत्महत्या करू नये म्ळणून रात्री 8 वाजेपर्यंत तो त्यांच्यावर नजर ठेऊन होता. त्यानंतर पोलिसांना व कुटुंबियांना माहिती देण्यासाठी तो तलाव परिसरातून निघाला. घरी पोहोचून त्याने सर्वांना माहिती दिली. त्यानंतर सर्वजन कोराडी पोलिसांसह तलाव परिसरात मुलींचा शोध घेतला. मात्र, रात्री काहीच सापडले नाही. तलावाच्या बांधावर मुलींच्या चपला दिसल्या. आज शनिवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास तलावात मुलींचे मृतदेह सापडले आणि रोकडे व पटले परिवारावर शोककळा पसरली.

आशनाचा शेवटचा संवाद बहिणीशी
घरातून बाहेर निघून गेल्यानंतर शुक्रवारी आशनाने मोठी बहिण रोशनीला भ्रमणध्वनी केला. रोशनी विवाहीत असून ती छिंदवाडा येथे राहते. यावेळी आशनाने "माझ्‌याकडून मोठी चूक झाली आहे. ही चूक सुधारण्यासारखी नाही. मी आईवडीलांशी डोळे मिळवू शकत नाही. माझा शेवट जवळ आला आहे. हा माझा शेवटचा फोन आहे. यानंतर मी दिसणार नाही. मी आत्महत्या करीत आहे.' अशा शब्दात आपल्या बहिणीशी संवाद साधला. त्यानंतर रोशनीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तू घरी परत जा, तुला कुणीही काही बोलणार नाही, असे तिला सांगितले. त्यानंतर आशनाने भ्रमणध्वनी ठेवून दिला. तर रोशनीने आपल्या आईवडिलांना भ्रमणध्वनी करून सर्व माहिती दिली. दुसक्तया दिवशी मुलींच्या मृत्यूचाच निरोप घरी पोहोचला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.