- माणिक वर्मा - पूर्वाश्रमीच्या माणिक दादरकर (१६ मे, इ.स. १९२६ - १० नोव्हेंबर, इ.स. १९९६) या हिंदुस्तानी संगीत व सुगम संगीत या संगीतप्रकारांत गायन करणाऱ्या मराठी गायिका होत्या. त्या हिंदुस्तानी संगीतातील किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत.
- जागतिक दिवस
- अतातुर्क स्मृती दिन : तुर्कस्तान.
- ठळक घटना/घडामोडी
- १६९८ : कोलकाता बंदर स्थानिक राजाकडून ईस्ट इंडिया कंपनीने विकत घेतले.
- १९५८ : बडोद्याजवळ वेदसार येथे प्रायोगिक विहिरीत तेल सापडले.
- २००६ : श्रीलंकेतील तमिळवंशीय संसदसदस्य नादराजाह रविराजची कोलंबो येथे हत्या.
- जन्म/वाढदिवस
- ७४५ : मुसा अल-कझीम, शिया इमाम.
- १४८३ : मार्टिन ल्युथर, जर्मन धर्मसुधारक.
- १६८३ : जॉर्ज दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १८४५ : सर जॉन स्पॅरो डेव्हिड थॉम्पसन, कॅनडाचा चौथा पंतप्रधान.
- १८७१ : विन्स्टन चर्चिल, इंग्लिश लेखक.
- १८८८ : आंद्रेइ तुपोलेव्ह, रशियन विमान अभियंता.
- १८९५ : जॉन क्नुडसेन नॉर्थ्रोप, अमेरिकन विमान अभियंता.
- १९०४ : कुसुमावती देशपांडे, श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक.
- १९१८ : मार्टिन हेनली, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९१९ : मिखाइल तिमोफीविच कलाश्निकोव्ह, रशियन संशोधक.
- १९१९ : मॉइझे त्शोम्बे, काँगोचा पंतप्रधान.
- १९३३ : सेमूर नर्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४१ : ल. रा. पांगारकर, संत चरित्रकार आणि प्राचीन वाड;मयाचे इतिहासकार.
- १९५२ : सानिया तथा सुनंदा बलरामन्, सुप्रसिद्ध लेखिका.
- १९६४ : आशुतोष राणा, हिंदी चित्रपट अभिनेते.
- १९७२ : नईम अशरफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७३ : झहीद फझल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७८ : मफिझुर रहमान, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- १९८५ : आफताब अहमद, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
- १४४४ : व्लादिस्लॉस तिसरा, पोलंडचा राजा.
- १५४९ : पोप पॉल तिसरा.
- १६७३ : मिकाल विस्नियोवियेकी, पोलंडचा राजा.
- १९३८ : मुस्तफा कमाल अतातुर्क, तुर्कस्तानचा संस्थापक व राष्ट्राध्यक्ष.
- १९८२ : लिओनिद ब्रेझनेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९५ : केन सारो-विवा, नायजेरियाचा लेखक.
- १९९६ : माणिक वर्मा, सुप्रसिद्ध गायिका
- २००० : जाक शबान-देल्मास, फ्रांसचा पंतप्रधान (जन्म-१९१५).
- २००३ : कनान बनाना, झिम्बाब्वेचा राष्ट्राध्यक्ष.
- २००९ : सिंपल कपाडिया, चित्रपट अभिनेत्री व डिंपल कपाडियाची छोटी बहिण.