ब्रम्हपुरी/प्रतिनिधी :-
प्राथमिक आरोग्य केंद्र गांगलवाडी येथे शुक्रवारी ला सकाळी १०:३०वाजता मानव विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या मानव विकास कार्यक्रमांतर्गत विविध योजना व उपक्रम स्त्रीरोगतज्ज्ञांकडून गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली ,० ते ६ महिने वयोगटातील बालकांची व स्तनदा मातांची तपासणीकरण्यात आली ,त्यांना औषधोपचार करण्यात आले , ६ महिने ते २ वर्षे वयोगटातील बालकांची बालरोगतज्ज्ञाकडून तपासणी करण्यात आली .
किशोरवयीन मुलींना पौगंडावस्थेतील आरोग्य व जीवनकौशल्ये विकसित करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले,
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येक महिन्यात किमान २ शिबिरे आयोजित करने , शिबिरे आयोजनाबाबतची माहिती सर्व संबधित ग्रामपंचायतींच्या आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना देण्यात येणे शिबिराच्या ठिकाणी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ यांच्याकडून लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी व उपचार करून घेणे,एक वेळचा अल्पोपाहार लाभार्थ्यांना देण्यात येतो. गरोदर मातांचा व ६ महिन्यांपर्यंत स्तनदा मातांचा पाठपुरावा केला जातो.
तसेच जोखमीच्या मातांना उपचार व संदर्भिय माहिती देण्यात आली.असून मानव विकास कार्यक्रमांतर्गत शिबिरे प्राथमिक आरोग्य केंद्र देण्यात येणारे लाभ / सेवा
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने लाभार्थ्यांना ने-आण करण्याकरिता केंद्राच्या वाहनाचा वापर करण्यात आला , शिबिरामध्ये लाभार्थ्याना एक वेळ अल्पोपाहार देण्यात आला ,तसेच इत्यादि माहिती डॉ.एम.एस.सुखदेवे मँडम वैधकिय अधिकारी यानी मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत दिली.
या कार्यक्रमाला डॉ.एम.एस सुखदेवे वैधकीय अधिकारी प्राथ.आ.केंद्र.गांगलवाडी,आरोग्य सेवक श्री.एस.के.धोटे,राऊत साहेब , चतट्टें साहेब ,बनकर साहेब ,सहारे मँडम ,चन्ने मँडम ,मैदमवार मँडम ,अलोन साहेब ,चहांदे साहेब ,बगमारे साहेब ,आदी वैधकीय कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र गांगलवाडी उपस्थित होते.