केवळ बलात्काराची धमकी दिल्यानंतर नाही तर गुंडाने बलात्कार केल्यानंतर तक्रार करायला या, असं धक्कादायक उत्तर नागपूर पोलिसांनी दिलं.
नागपूरच्या अमिता जयस्वाल या तरुणीनं काही दिवसांपूर्वी अतिक्रमणाविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर तिला गुंडांकडून धमक्या यायाला सुरुवात झाली आहे. याविरोधात ती पोलिसात गेली. त्यावेळी तिला पोलिसांनी हे धक्कादायक उत्तर दिलं.
सक्करदरा परिसरात राहणाऱ्या अमिता जयस्वालनं तिच्या परिसरातील एका अतिक्रमणाची तक्रार महापालिकेकडं केली होती. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर महापालिकेने ते अतिक्रमण काढले. मात्र यानंतर अमिता जयस्वाल आणि तिच्या कुटुंबियांना परिसरातील काही गावगुंडांनी जगणं मुश्कील करुन टाकलं आहे.
सध्या जयस्वाल कुटुंबियांच्या घरावर रात्री-अपरात्री दगडफेक केली जातेय.
हे गुंड मनात येईल तेव्हा जयस्वाल कुटुंबियांच्या घरावर हल्ला करतात, बलात्काराची धमकी देतात. नागपूर पोलीस मात्र गुन्हा घडण्याची वाट पाहात मौन धारण करुन आहेत.
हे गुंड जयस्वाल कुटुंबियांच्या खासकरून अमिताच्या मागे लागले आहेत. येता- जाता अश्लिल शिव्या देणे, चाकू – इतर हत्यारे दाखवून धमकावणे, रात्री अंधारात घरावर दगड फेकणे, घराच्या दारावर लाथा मारणे असे प्रकार अमिता सहन करत असतानाच, काल रात्री घरावर चालून आलेल्या 15 ते 20 लोकांच्या जमावाने अमिताला बलात्काराची धमकी दिली.
धक्कादायक बाब म्हणजे घाबरलेल्या अमिताने त्वरित सक्करदरा पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. मात्र, गुन्हा घडेल फक्त या आधारावर तक्रार घेता येत नाही, गुन्हा घडल्यावर तक्रार दे, असे सांगून पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी तिची तक्रार घेणे तर दूर, तक्रारीची पोच पावती देण्यासही नकार दिला.
याच वर्षी मार्च महिन्यात जेव्हा अमिताने महापालिकेकडे अतिक्रमणाबद्दल माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती आणि नंतर तक्रार दिली होती. त्यावेळीही अमिताच्या घरावर हल्ला झाला होता. तेव्हा मध्यरात्री अमिता आणि तिच्या भावाने घाबरलेल्या अवस्थेत खासदार नितीन गडकरी यांचे संपर्क कार्यालय गाठून स्वतःला वाचविले होते.
त्यावेळी नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून थेट पोलीस आयुक्तांना प्रकरणाची माहिती दिल्यानंतरही सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये काहीच कारवाई झाली नव्हती.
आम्ही या प्रकरणासंदर्भात सक्करदरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पवार यांना वारंवार फोन केले. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असा दावा जयस्वाल कुटुंबाचा आहे.
दरम्यान, गुन्हा घडल्यावर त्याचा तपास करणे हे पोलिसांचे कर्तव्य असले, तरी घडू शकणाऱ्या गुन्ह्याला प्रतिबंध घालणे हेही पोलिसांचे कर्तव्य आहे. आणि बलात्कार घडला नाही ना.. घडल्यावर गुन्हा दाखल करू असे म्हणणारे नागपूर पोलीस फक्त कर्तव्यात कसूर करत नाहीत, तर निर्लज्जतेचे कळस गाठत आहे, असंच म्हणाव लागेल.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
ब्रम्ह्पुरी प्रतिनिधी :- गेली आठ वर्षे राजकीय आखाड्यात अडकून पडलेल्या वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया हा जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला. मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रबोधनाची गरज आहे असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी केले. ब्रम्हपुरी येथील पंचशील वसतिगृह मैदान येथे संत गाडगेबाबा राज्य स्तरीय प्रबोधन अभियान अंतर्गत चमत्कार प्रात्यक्षिकांसह शुक्रवारी "वृक्ष तेथे बाया बुवा तेथे बाया" या विषयावर प्राचार्य श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करतांना बोलत होते. या कार्यक्रमात प्रा. शाम मानव यांनी सर्व जनतेला पटवून दिले की देव धर्माला माझा विरोध नाही.त्यांच्या नावावर सामान्य माणसाला लुबाडनाऱ्याना विरोध असून समाजात होणाऱ्या अनिष्ट चालीरीती स्त्रियांच लैगिक शोषण याना बळी पडू नये ,,खरे संत कसे ओळखायचे प्रात्यक्षिक चमत्कार करून जनजागृती करून समाजातील अंधश्रध्देंच्या अधीन झालेल्या मानवाच्या डोक्यातून कचरा काढून कस्ल्याही प्रकारचे तंत्र मंत्र सिद्धी नाही असेल तर तंत्र...
नागपूर : येथील माजी महापौर आणि माजी आमदार कृष्णराव रामाजी पांडव यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (ता. 22) निधन झाले. ते 88 वर्षाचे होते. 1970 साली त्यांनी नागपूर महानगरपालिकेत उपमहापौर, 1971 मध्ये स्थायी समिती अध्यक्ष आणि 1973 साली महापौरपद भूषविले. 1981 साली जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष, त्यानंतर प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम बघीतले. बारा वर्ष त्यांनी विधानपरिषदेत आमदार म्हणून महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. नगरसेवक ते आमदार या राजकीय प्रवासात त्यांनी प्रदेश कॉग्रेस कार्यकारिणीत विविध पदे भूषविली. सन्मार्ग शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. गरीब होतकरु आणि मागासवर्गातील मुलांना शिक्षणाची द्वारे खुली करुन देण्यासाठी या संस्थेमार्फत जवळपास 45 शैक्षणिक महाविद्यालयांची स्थापना करुन भरीव कार्य केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, केंद्रीय मंत्री वंसतराव साठे, निर्मलाबाई देशपांडे यांचेसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या मागे गिरीश आणि किरण अशी दोन मुलगे, चार मुली असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवारी (ता. 23) बारा वाजता धंतोली येथील निवासस्थानातून निघू...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...