चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे पट्टेदार वाघांचा हक्काचा अधिवास. या प्रकल्पात वाघांचे नैसर्गिक स्थितीतील दर्शन घेण्यासाठी हजारो पर्यटकांची वर्षभर रीघ लागते. पावसाळ्यात देशातील सर्व व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद केले जात असताना ताडोबा मात्र त्याला अपवाद होता. मात्र आता राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने पावसाळी पर्यटन बंद करण्याचे कठोर निर्देश जारी केल्यामुळे १ जुलैपासून ताडोबा पर्यटनासाठी पूर्णपणे बंद असणार आहे. गेली काही वर्षे ताडोबातील प्रवेश ऑनलाईन झाले आहेत. यामुळे देशातील शेकडो पर्यटकांनी कित्येक दिवस आधीच ताडोबातील पावसाळी पर्यटनासाठी बुकिंग केले होते. याशिवाय ताडोबा आता पर्यटन नकाशावर असल्याने शेकडोंच्या संख्येत रिसॉर्ट ताडोबाच्या आसपास उभारले गेले आहेत. मोठा गाजावाजा करून ताडोबाचे जागतिक पर्यटन करण्याचा घाट घातला गेल्यावर आता अचानक ताडोबा पूर्ण बंदचा निर्णय झाल्याने रिसॉर्ट मालक आणि पर्यटक हिरमुसले आहेत. यंदा राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. यासाठी येणारे मंत्री , लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना वाघांच्या दर्शनासाठी प्रकल्प सुरु ठेवण्याचा दबाव होता. मात्र एनटीसीए च्या निर्देशांमुळे यावर पूर्णविराम मिळाला आहे. याशिवाय ताडोबाच्या बाह्य भागात सुरु असलेले पर्यटन देखील बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने ताडोबातील एकूणच व्यवहार ३ महिने ठप्प होणार आहेत.
Monday, July 02, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
फुलपाखरांचे जग ताडोबा :नक्की वाचा काय आहे चंद्रपूर /प्रतिनिधी: वाघ, शेकडो अन्य वन्यजीव, विपूल वनसंपदा, पक्षांच्या शेकडो प्रजाती आणि
ताडोबात वाघाची पर्यटक जीप्सीवर झडप नागपूर/ललित लांजेवार व्याघ्र दर्शनासाठी पर्यटकात नेहमी उत्सुकता असते,त्यासाठीच व्याघ्र
ताडोबाच्या जंगलात आढळला काळा बिबट नागपूर/ललित लांजेवार: घनदाट जंगल व पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबात बऱ्याच वर्षानंतर
चंद्रपूर येथे जंगल सफारी डीपीआर तयार करण्यासाठी टाटा ट्रस्ट समवेत करार मुंबई/प्रतिनिधी: चंद्रपूर येथे जंगल सफारी स्थापित करण्यासाठी ताडोबा- अंधारी व्याघ्र प
ताडोब्यात ५ वाघांचे एकत्र दर्शन नागपूर/ललित लांजेवार: घनदाट जंगल व पट्टेदार वाघांसाठी जगप्रसिध्द असलेल्या चंद्रपूरच्या ताडोबा-
Tigers of Chandrapur short film implemented by Poonam and Harshawardhan Dhanwatey with their field team Providing inf
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য