সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, July 03, 2018

आमदार भांगडिया यांना रेती तस्कराची ट्रकने उडविण्याची धमकी

 नागपूर - रेती तस्कराने चिमुरात महसूल कर्मचाऱ्यास पेटविण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त ताजे असतानाच चिमूर तालुक्यातील भिसी येथील रेती माफियाने चक्क आमदारांनाच ट्रकने उडवून टाकण्याची धमकी दिली असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चिमूरचे आमदार बंटी उर्फ कीर्तिकुमार भांगडिया यांनाच ही जीवे मारण्याची धमकी रेती माफियाने दिली आहे.
 चिमूर विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार बंटी उर्फ कीर्तिकुमार भांगडिया यांनी  निवडून आल्यावर आपल्या मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरू केला आणि यासोबतच अवैध धंदेवाईकांविरुद्ध एल्गार पुकारला. आमदार भांगडिया आपल्या मतदारसंघात जनसंपर्क दौऱ्यावर असताना ११ व १२  मेच्या मध्यरात्री त्यांना कानपा ता. नागभीड येथे अवैध खनन करीत रेतीची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली.
शासनाच्या महसुलाची चोरी थांबविण्याच्या दृष्टीने त्यांनी चंद्रपूर व भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षकांना तत्काळ दुरध्वनीवरून सुचना दिली. चंद्रपूर पोलिस अधिक्षकांनीही  लगेच दखल घेत ब्रम्हपुरीचे पोलिस उपअधिक्षक परदेशी यांना  कारवाईच्या सुचना केल्या. त्यांनी कारवाई करीत तेव्हाच १५ ते २० ट्रकसह अवैध खणलेली रेती मुद्देमाल जप्त केला. या घटनेनंतर हा संदर्भ देत रेती कंत्राटदार धनराज मुंगले (रा. भिसी) यांनी आमदार भांगडिया यांचे सहकारी मुंतझीर लखानी (ब्रम्हपुरी) यांच्याकडे ‘आमदारांनी रेती तस्कराच्या तक्रारी करू नये, त्यांचे चिमूर-नागपूर जाणे-येणे असते त्यांना रस्त्यातच ट्रकने उडवून टाकू’ असे सांगून आमदारांना समजाविण्याचा सल्ला दिला.
मुंगले एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी रविवारी १ जुलै रोजी लोकशाही वार्ताचे संपादक भास्कर लोंढे यांना भेटल्यावर पुनश्च तीच धमकी दिली व आमदारांना समजाविण्याचा सल्ला दिला.
धनराज मुंगले यांनी रेतीचे अवैध खनन केल्याने मार्च  २०१८ मध्येही चंद्रपूर जिल्हाधिकाºयांनी कारवाई करून त्यांची पोकलँड मशिन जप्त केली होती. मुंगले यांचा रेतीच्या तस्करीत हात असल्यामुळेच त्यांनी माझ्या सहकाºयांमार्फत धमक्या दिल्या असून यामुळे माझ्या जीवीताला धोका निर्माण झाल्याची तक्रार आमदार बंटी भांगडिया यांनी आज २ जुलैला चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. तसेच या गंभीर प्रकाराची माहिती महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कळविली आहे.
राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून नागपुरात होत असून या पार्श्वभूमीवर या प्रकरणी शासन काय पावले उचलते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.