সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, July 07, 2018

पोलीसांच्या तत्परतेने शेकडो नागरिक पोहचले घरी

चंद्रपूर/प्रतिनिधी:

दोन दिवसांपासून चंद्रपुर जिल्हयात सुरू असलेल्या सतंतधार पावसामुळे जिल्हयातील बऱ्याच ठिकाणातील जिवनमान विस्कळीत झाले. कुठे नदीला पुर येवुन वाहतुक ठप्प झाली तर कुठे झाडे पडलेली दिसुन आली.आदिलाबादकडुन चंद्रपुर जिल्हयात दाखल होणारा महत्वाचा मार्ग म्हणजेच
आदिलाबाद हायवे दोन दिवस सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे गडचांदुर पोलीस स्टेशन हद्दीतील आदिलाबाद या हायवेवरील एक अवाढव्य झाड रस्त्यावर कोसळुन पडल्याने संपुर्ण वाहतुक ठप्प झाली. वाहतुक ठप्प झाल्याची माहिती पोलीस स्टेशन गडचांदुर ला मिळताच त्यांनी तात्काळ संबंधीत विभागास माहिती दिली. रस्त्यावर वाढणारा वाहनाचा ओघ आणि संबंधीत विभागास पोहोचण्यास विलंब लागत असल्याने पोलीस स्टेशन गडचांदुर येथील प्रभारी अधिकारी यांनी आपले पोस्टेन येथील 03 कर्मचारी तात्काळ घटनास्थळी रवाना केले.रस्त्यावरील ठप्प असलेली वाहतुक पाहुन पोना. सुदेश महतो, पोना. श्रीनिवास राठोड, पोशी अमोल कांबळे यांनी कोणताही विलंब न लावता गावकऱ्यांच्या मदतीने रस्त्यावरील झाड कापुन रस्त्यात अडकलेल्या लोंकाना आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला.या तिन्ही कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या आपल्या या तत्परतेमुळे आणि त्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे शेकडो नागरीकांना आपापल्या ठिकाणी सुखरूप पोहचण्यास मदत करून केलेल्या उत्कृश्ठ कामगरीबदद्ल मा. पोलीस अधीक्षक श्रीमती नियती ठाकर यांनी या कर्मचाऱ्यांना योग्य बक्षिस देवुन त्यांना गौरविण्यात आले.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.