সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, June 09, 2018

चंद्रपुरात किडणी चोर असल्याच्या संशयावरून मंदबुद्धी तरुणास बेदम मारहाण

नागपूर/ललित लांजेवार:
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात सोशल मीडियातून किडणी चोर व लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा चांगलीच पसरली आहे, अश्यातच  शनिवारी चंद्रपूर येथील रयतवारी परिसरातील बी.एम.टी चौका नजिक दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान एक मंदबुद्धी तरुण भटकत असतांना त्या तरुणाला किडनी चोर असल्याच्या संशयावरून नागरिकांनी बेदम मारहाण केली. विवेक नगराळे असे या मंदबुद्धी असलेल्या तरुणाचे नाव असून तो राजुरा जवळील चुनाळा येथील असल्याचे सांगितल्या जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास रयतवारी परिसरातील बी.एम.टी चौकाजवळ परिसरातील काही लहान मुले खेळत होती आधीच संपूर्ण जिल्ह्यात किडणी चोर व लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा पसरविली असतांना अश्यातच मंदबुद्धी विवेक हा या मुलांच्या अवती भवती वावरतांना दिसला तेव्हा परिसरातील महिलांना विवेकवर संशय आला आणि त्याला तेथील  महिलांनी किडणी चोर व लहान मुलांना पळविणाऱ्या टोळीतील व्यक्ती असल्याचा संशयावरून चांगलीच मारहाण केली, यानंतर तेथील युवकांनी त्याला जखमी अवस्थेतच दुचाकीवर बसवून रामनगर पोलिसात आणले, रामनगर पोलिसांनी चौकशी केली असता तो मंदबुद्धी असल्याचे निष्पन्न झाले,मारहाणीत विवेक जखमी झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले व त्याच्या परिवाराला बोलावून त्याला सुपूर्त करण्यात आले.
 विवेक हा मंदबुद्धी असल्यने तो गेल्या बऱ्याच दिवसापासून कुठेही फिरत असल्याचे चौकशी दरम्यान समजले  ,तर त्याच्या अश्या वागण्याने देखील घरच्यांनी त्याला वाऱ्यावर सोडल्याचे समजते.  असाच काहीसा प्रकार गेल्या काही दिवसांपासून कोठारी परिसरात घडत आहे.कोठारी व परिसरातील अनेक गावांत किडणी चोर व लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा पसरविली जात असून नागरिक दहशतीखाली वावरत आहेत.  सोशल मीडियातून व्हिडिओ चित्रफित व मॅसेज वायरल करण्याच्या घटना वाढतच आहे़ त्यामुळे अशी अफवा निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी  नजर ठेवणे आवश्यक आहे,अश्या अफवांच्या आधारावर अनोळखी इसमांना पकडून त्यांचेकडे संशयतेने बघितले जात आहे.व संशयतांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन न करता व कोणतीही शहानिशा न करता त्यांना बेदम मारहाण केली जात आहे.सदर घटनेत देखील नागरिकांनी कायदा स्वताच्या हातात घेतल्याचे चित्र दिसून आले व एका निरपराध मंदबुद्धी व्यक्तीला विनाकारण मारहाण करण्यात आली,अश्या घटनांकडे पोलिसांनी जातीने लक्ष घालून जनजागृती करण्याची आवश्यकता या प्रकारावरून दिसून येत आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.