সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, June 12, 2018

वर्धा जिल्ह्यातील सोलर प्रकल्पामुळे भारत आणि चीनचे संबंध होणार दृढ

India and China relation will be strong due to Solar project in Wardha district | वर्धा जिल्ह्यातील सोलर प्रकल्पामुळे भारत आणि चीनचे संबंध होणार दृढवर्धा/प्रतिनिधी:
भारत आणि चीनचे संबंध चांगले मैत्रीपूर्ण राहावे तसेच महात्मा गांधी यांचे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा हे स्वप्न साकार करण्यासाठी शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाच्या सुविधेकरिता सोलर सिंचन प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमाने शेतकऱ्यांनी बारमाही शेती करावी, असे प्रतिपादन सोलर सिंचन प्रकल्पाच्या हस्तांतर आणि प्रकल्पाची पाहणी करताना चीनचे भारतातील मुंबई दुतावास कार्यालयातील अधिकारी (कॉन्सलर जनरल) चांग झीयुन यांनी पिंपळगाव (भोसले) येथे केले.
चीनच्या सौर उर्जा प्रौद्योगिकी नावावर आणि सहयोगाने गरीबी उन्मूलनच्या पायलट कार्यक्रमांतर्गत मुंबई आधारित चीन वाणिज्यिक दूतावास युन्नान अक्षय उर्जा कंपनी मर्यादितच्या पिंपळगाव (भोसले) व नटाळा येथे प्रायोगिक तत्वावर चीन सरकार व जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरू केला. या प्रकल्पाचण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी चीन सरकारचे मुंबई येथील दूतावासातील अधिकारी (वाणिज्यिक कॉन्सलर) वाँग शिलकाई, प्रकल्पाचे मार्गदर्शक कोकण विभागाचे माजी आयुक्त नानाजी सत्रे, वांग ली, अश्विनी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आर्वीच्या सभापती शिला पवार, सरपंच जीवन राऊत उपस्थित होते. या प्रकल्पामध्ये शेतकºयांना समप्रमाणात पाणी उलपब्ध व्हावे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाणी वितरणाच्या पाच नलिकेचे चेंबर बनविविले यामध्ये १० उपनलिका तयार केल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
या सोलर सिंचन प्रकल्पासाठी चीन सरकारच्यावतीने १.६० कोटी तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने ३० लाखांचा खर्च झाला आहे. या धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी ३० एच.पी. मोटरपंप बसविला आहे.
यावेळी कार्यक्रमाला प्रकल्पाचे समन्वयक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी माजी अधिकारी शिंदे, उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, जलसंपदा विभागाचे उपअभियंता साबळे, जिल्हा परिषदच्या लघु सिंचन विभागाचे उपअभियंता लांडगे, ससाने, पोलीस पाटील सतीश इंगोले व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी चीन प्रतिनिधींनी प्रकल्पाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
राज्यातील पहिला सोलर सिंचन प्रकल्प
चीनच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प राज्यातील पहिला सोलर सिंचन प्रकल्प असून या प्रकल्पामुळे पिंपळगाव व नटाळा येथील जवळपास ५० शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाचा लाभ होणार आहे. यामुळे या परिसरातील २२ हेक्टर शेती सोलर सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पामुळे सध्या ३० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.