चंद्रपूर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारासाठी अपुरस्कृत वअनिवासी फिल्म आणि मिडिया इंडस्ट्रीमधील करिअर संधी कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन 28 जून ते 3 जुलै 2018 या कालावधीत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूर तर्फे करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण 5 दिवसाचे असून फिल्म आणि मिडिया इंडस्ट्री क्षेत्रात स्वत:चे करिअर घडविण्यास इच्छुक असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी सदर प्रशिक्षण असणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये मिडिया इंडस्ट्री कार्यशाळेत फिल्म आणि टीवी प्रोडक्शन, विडीओ आणि फिल्म मेकींग, साउंड डिझायनिंग, ॲनिमेशन, कारच्युम, ॲक्टींग, डायरेक्शन, कोमा स्टुडिओ डायरेक्शन, मल्टीकॅम्प सेटअप,जर्नलीझम ॲन्ड मास कम्युनिकेशन ईत्यादी विषय शिकविल्या जाणार असून या विषयावर तज्ञांव्दारे मार्गदर्शन दिले जाणार आहे.कार्यशाळा मध्ये प्रवेशासाठी किमान 10 वी पास व 18 ते 45 वर्ष वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार असावा. त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला मार्क शीट, राशन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड, पासपोर्ट फोटो इत्यादी मूळ प्रतीत असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रवेशासाठी 27 जून 2018 पर्यत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,उद्योग भवन, बस स्टॉप समोर,चंद्रपूर येथे संपर्क साधवा. असे, प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,चंद्रपूर यांनी कळविले आहे.