चंद्रपुर/प्रतिनिधी:
चंद्रपूरच्या एका वाहतूक शिपायाने कर्तव्यावर असताना पोलिसातील माणुसकीचा परिचय दिला आहे.
चंद्रपूरच्या एका वाहतूक शिपायाने कर्तव्यावर असताना पोलिसातील माणुसकीचा परिचय दिला आहे.
एका रुग्णाला रक्ताची गरज आहे आणि तो रक्तगट आपलाही आहे, हे समजताच चंद्रपुर वाहतूक पोलीसात कार्यरत असणाऱ्यां पोलीस कर्मचाऱ्यानी रुग्णालयात जावून रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपत एक उदाहरण जगासमोर निर्माण केले आहे.
संदीप वझे असे या वाहतूक शिपायाचे नाव असून त्यांनी कर्तव्यावर असताना एका गरजू रुग्णाला तात्काळ रक्तदान केले. संदीप वझे हे शनिवारी दुपारी २ वाजताच्या प्रियदर्शनी चौकात कर्तव्यावर होते. अशातच त्यांच्याजवळ रक्तदान निस्वार्थ सेवा संस्थेचे काही लोक आले. मोनिका पिसे या एका सिकलसेल असलेल्या महिला रुग्णाला रक्ताची अत्यंत गरज असल्याचे त्यांनी संदीप वझे यांना सांगितले.त्यांनी क्षणाचाही विलंब न आपल्या कर्तव्य स्थानावर एका साथीदार पोलीस कर्मचाऱ्याची मदत घेत लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन रक्तदान केले. व पोलिसातील माणुसकीचे जिवंत उदाहरण सर्वांपुढे ठेवले. संदीप वझे यांनी रक्त दिल्याने गंभीर स्थिती टळून त्या गरजू महिलेला उपचार मिळाले.व सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली.विशेष म्हणजे या पोलिसाने वर्दीवर असतांना रक्तदान केले. त्यांच्या या कार्याने निस्वार्थ सेवा संस्थेच्या लोकांनी त्यांचे आभार मानले.संदीप यांनी केलेल्या कार्यामुळे त्याच्यावर समाजातील सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.