कारंजा मार्गे मध्यप्रदेश जाणारा बोरिंग खोदणाऱ्या ट्रकचा रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास
कारंजा - भरसिंगी रोडवर तरोडा या गावाजवळ चक्रीघाटावर ट्रक फेल झाल्याने पलटला व अपघात झाला.

त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. यात दंनचल चंदर वय २०,लक्ष्मीपुत्र बिलासदास वय २०,नावरेवसिंग वय ३०, माधव वय ४०. यांचा समावेश आहे.तर जखमीनमध्ये रुखदार घोर वय ३२,शोभा लकी वय १९,टिनात लकी जानी वय १८,तुळशीराम जानी वय २९,रघू उज्जरे वय १९, यांचा समावेश आहे. हे सर्व जखमी मजूर ओडिशा राज्यातील असल्याची माहिती आहे. चक्रीघाटावर ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने ट्रक मागे येऊ लागला आणि हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे.