शुक्रवारी जिल्हा परिषद नागपुर
येथील नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय कुमार यादव यांची
नागपुर जिल्हा ग्रामसेवक संघाचे वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली.शिष्टमंडळात
विभागीय अध्यक्ष विलास भाऊ मुंडे,भारत मेश्राम जिल्हा अध्यक्ष
नागपुर,श्रीकांत भर्रे मानद अध्यक्ष ,पंजाब राव चव्हाण उपाध्यक्ष,पुनम ताई
पांडे(काळसर्पे)सरचिटणिस,धैर् यधर शेंडे तालुका अध्यक्ष हिंगणा,महेंद्र
लांजेवार कोषाध्यक्ष हिंगणा,भारत चव्हाण अध्यक्ष उमरेड,संघाचे मौदा येथील
पदाधिकारी श्री गाडगे साहेब उपस्थित होते.यावेळी श्री यादव यांना संघाचे
शिष्टमंडळ यांचे वतीने पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात
आली.नागपुर जिल्हा राज्यात नंबर एक वर आनण्यासाठी जिल्ह्यातील सर्व
ग्रामसेवक नविन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नेतृत्वात प्राणपनाणे
सहकार्य करण्याची हमी उपस्थित मंडळी नी दिली. जिल्ह्यातील ग्रामसेवक
संवर्गाचे प्रश्न सोडविण्याबरोबरच ग्रामसेवकांचे पाठीशी खंबीरपणे उभे राहु
तसेच निर्भीड वातावरणात सर्वानी कामे करावी तसेच कुणावर ही चुकीची कारवाई
एक कुटुंब प्रमुख या नात्याने होणार नाही त्याचप्रमाणे प्रशासनाचे निर्णय
प्रक्रियेत संघाचे भूमीका प्राधाण्याने लक्षात घेतली जाईल असे आश्वासन श्री
यादव यांनी दिले.
Friday, June 15, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য