সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, June 11, 2018

आता फिरते वीज बिल भरणा केंद्र

Now mobile electricity bill payment center | आता फिरते वीज बिल भरणा केंद्र नागपूर/प्रतिनिधी:
 वीजबिल भरण्याची तयारी असतानाही बिल भरणा केंद्र्र नसल्याने नियमित वीजबिल भरणा करण्यास असमर्थ असलेल्या ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी महावितरणने त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांना वीज बिल सहजरीत्या भरता यावे यासाठी फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, सुरुवातीस विदर्भातील २८ गावांसह राज्यातील ५० गावांतून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्यास मिळणाऱ्या प्रतिसादानुसार या उपक्रमाची व्याप्ती निश्चित केल्या जाणार आहे.
साप्ताहिक बाजाराला आलेल्या विद्युत ग्राहकांना बाजारस्थळीच त्यांच्या वीजबिलाचा भरणा करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविल्या जाणार असून या उपक्रमाअंतर्गत निवडण्यात आलेल्या या गावांमधील साप्ताहिक बाजार, सार्वजनिक ठिकाणांवर हे वाहन फिरविण्यात येणार असून या फिरत्या वीज भरणा केंद्रामध्ये इंटरनेट, संगणक, प्रिंटर आदीची सुविधा उपलब्ध राहणार आहे. याशिवाय या वाहनात महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबतच जनतेला याबाबत माहिती मिळण्यासाठी उद्घोषणा करण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. दुर्मीळ वस्ती आणि दुर्गम भागातील गावांसोबतच वीज भरणा केंद्राची सोय उपलब्ध नसलेल्या गावांचीही या सुविधेसाठी निवड करण्यात आली असून दाट लोकवस्ती मात्र मोजकेच वीज बील भरणा केंद्र असलेल्या गावांसोबतच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वीज बिल भरणा केंद्र नसलेल्या गावांचाही यात विचार करण्यात येत आहे. ज्या गावातील वीजबिलाची वसुली क्षमता कमी आहे, अशा गावातूनही ही मोबाईल व्हॅन फिरविल्या जाणार आहे.
सध्या अकोला जिल्ह्यातील कापसी आणि अडेगाव, बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा, हिरडाव आणि आसलगाव जामोद, वाशिम जिल्ह्यातील मोप, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव मंगूल दत्तगिर आणि राजूरा बाजार, यवतमाळ जिल्ह्यातील मुकुदमन, शेंभलपिंपरी आणि अकोला बाजार, चंद्रपूर जिल्ह्यातील देव्हाडा, घुग्गूस आणि शेगाव, गडचिरोली जिल्ह्यातील घोट आणि कोटगाव, भंडारा जिल्ह्यातील शहापूर आणि बारवा, गोंदिया जिल्ह्यातील साखरी टोला आणि फुलसुर, नागपूर जिल्ह्यातील तेलगाव, भिलगाव, येरखेडा आणि पारशिवनी तर वर्धा जिल्ह्यातील काजूमवरग्राम, पोहरा आणि गौल या गावांचा समावेश असून, लवकरच ही सुविधा येथील गावकऱ्यांसाठी महावितरणतर्फे सुरू करण्यात येत आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.