पवनी वनपरीक्षेत्रांतर्गत पवनी-तुमसर राज्यमार्गावर हिवरा बाजार ते सालई दरम्यान दिनांक28/06/2018 चे रात्री कुठल्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चार चितळांचा जागीच मृत्यू झाला तर पाचवा गंभीर जखमी असल्याने त्याला रेस्क्यू सेंटर नागपुर येथे पाठविण्यात आले आहे.तिथे त्याचेवर उपचार सुरु असल्याचे वनविभागाच्या सुत्रांनी सांगीतले. ऊपरोक्त राज्यमार्गावर बावनथडी नदीवरील देवनारा रेतीघाटावरुन रेती भरलेले दहाचाकी ट्रक्स मोठ्या संख्येत ये जा करतात.यापैकी एखाद्याने या चितळांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.याप्रकरणी वनविभागाने प्रकरण नोंदविले आहे.याप्रकरणी पवनीचे वनक्षेत्रपाल सुमीत कुमार(आयएफएस) हे अधीक तपास करीत आहेत.
रामटेक
वनपरीक्षेत्रांतील नगरधन शिवारांत काळविटाच्या शिकारीचे प्रकरण ताजे
असतांनाच व त्याप्रकरणांत आरोपींना गजाआड करण्यात वनाधिकार्यांना यश आले
नसतांनाच ऊपरोक्त घटनेत चार चितळ मृत्युमुखी पडल्याने शंका कुशंकांचे पेव
फुटले आहे.