সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, June 26, 2018

चंद्रपूरच्या ४५ प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आदेश प्रदान

प्रकल्पग्रस्तांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान:अहीर 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
शेतकऱ्यांच्या   हिताचे रक्षण, त्यांच्या न्यायहक्काचे संरक्षण हे अग्रक्रमावरील कर्तव्य समजून वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या न्यायाचा लढा लढला हा आपल्या जीवनातील सर्वात मोठा लढा आहे. शेतकऱ्यांच्या  जमीनीला सार्थकी मोबदला मिळण्याकरिता केलेला संघर्ष राजकीय जीवनातील मोठी उपलब्धी असल्याची भावना व्यक्त करतांनाच दिलेला शब्द पूर्ण करू शकलो याचे समाधान वाटते. कोल इंडिया, वेकोलि प्रबंधनाला जमिनीच्या मोबदल्यासाठी व प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीकरिता बाध्य केले. वेकोलि दुर्गापूर उपक्षेत्राअंतर्गत सिनाळा येथील वेकोलि प्रकल्पग्रस्तांना 52 कोटी रूपयांचे वितरण होणार आहे. यापैकी आतापर्यंत 38 कोटी रूपयांचे वितरण झाले असून 274 प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. प्रकल्पग्रस्तांमध्ये या विषयाला घेवून जी अस्वस्थता होती ती आता दूर झाली ही आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन कंेद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी केले. 
दुर्गापूर उपक्षेत्राअंतर्गत दि. 26 जून 2018 रोजी 45 वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आदेशपत्रा वितरण प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राहुल सराफ, सिनाळाच्या संरपंचा गीता वैद्य, उपसरपंच बंडू रायपुरे, जि.प. सदस्या रोशनी खान, पं.स. सदस्य संजय यादव, सुभाष गौरकार, विलास टेंभूर्णे, गंगाधर वैद्य, संतोष नरूले, राजू रत्नपारखी, किसान आघाडीचे राजू घरोटे, माजी पं.स. सदस्य लोकचंद कापगते, क्षेत्रिय महाप्रबंधक आभास सिंग, दुर्गापूरचे उपक्षेत्रिय अधिकारी प्रसाद, पोलीस पाटील सौ. नरूले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 
ना. हंसराज अहीर यांनी प्रकल्पग्रस्त शेतकÚयांना आश्वस्त करतांना सांगितले की, 269 हे.आर. जमीनीचा पूर्वीचा मोबदला केवळ 2 कोटी होता त्यात 26 पट वाढ होवून तो आता 52 कोटी झालेला आहे. वेकोलि प्रकल्पग्रस्तांवर होणारा कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही असे सांगत वेकोलिने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून शक्य तेवढे सहकार्य करीत त्यांच्या समस्यांचे निवारण केले पाहिजे, विकास योजना राबविल्या पाहिजे. प्रकल्पप्रभावीत गावांना सर्व मुलभूत सोयी-सुविधांनी आदर्श करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी आपण गांभीर्याने लक्ष घालू असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. 
आपल्या प्रास्ताविकातुन राहुल सराफ यांनी सांगितले की, केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी देशात सर्वप्रथम आमची जमीन आमचा भाव हा नारा दिला. वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी लढणारे एकमेव लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची लोकसभेत विशेष ओळख आहे. तब्बल 20 कोळसा खाण प्रकल्प त्यांनी रोखून धरत प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काचा भाव वाढवून दिला. राजकीय कारकीर्द पणाला लावत त्यांनी शेतकÚयांचे हित सर्वोपरी मानले. भाजपाचे लोकप्रतिनिधी सामाजिक जाणीवा ठेवून कार्य करणारे आहेत. विकास हा त्यांचा ध्यास आहे. त्यामुळे सर्वच बाबतील विकास सर्वत्रा दिसू लागला आहे. ना. हंसराजजी अहीर राज्याचे मंत्री सुधीरभाऊ सर्वसमावेशक भुमिका घेवून सर्वांना न्याय देत आहेत. 
या कार्यक्रमात 4.50 कोटी रूपयांचा मोबदला मिळालेल्या नाना बानकर तसेच 1 कोटी रूपयांचा मोबदला मिळालेल्या श्रीमती आत्राम व कुटूंबियांचा केंद्रीय गृह राज्यमंत्राी महोदयांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सिनाळा येथील नागरिक व प्रकल्पग्रस्त बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. 
ना. हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार 
सिनाळा येथील इयत्ता दहावीत सुयश प्राप्त केलेल्या रोहित दुर्योधन, अंजली वैद्य, साक्षी रामटेके, श्रुती रायपुरे, संजीवनी रायपुरे, प्रज्वल रायपुरे तर 12वीच्या पायल मडावी, करीश्मा, रोहीनी रामटेके, ऋतिक मांडवकर या गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी या सर्व विद्याथ्र्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक कारकीर्दीच्या उज्वल यशाच्या शुभेच्छा दिल्या. सरकारच्या शैक्षणिक योजनांचा लाभ घेवून पालकांनी आपल्या मुलांचे भविष्य घडवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.