अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल
चंद्रपूर शहरातील जटपुरा
गेट परिसरातील नावाजलेल्या इलेक्ट्रॉनिक दुकान असलेल्या
सोनी मार्केटिंग दुकानाला शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयाचे सामान जळून खाक झाल्याची माहिती
आहे.पाठ्मिक माहिती नुसार हि आग शोर्ट सर्किटने लागली असल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याची माहिती मिळताच महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती
देण्यात आली. त्यांनतर अग्निशामक विभागाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल
झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या भागात
पोलीस विभागाचा ताफा घटनास्थळी दाखल आला असून या भागातील वाहतूक हि एकेरी
करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी तिच्या सुमारास सोनी
मार्केटिंग या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. आग लागल्याची
माहिती मिळताच दुकानातील कर्मचारी आणि ग्राहकांची धावपळ झाली. त्यांनतर अग्निशामक विभागाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या आगीत लाखो रुप्याचे नुकसान झाल्याचा
प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र वृत्त प्रकाशित होई पर्यंत
आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले नव्हते.हि आग विजविण्यासाठी धारिवाल कंपनी, व चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रातून ७ गाड्या मागविण्यात आल्या होत्या.