সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, June 13, 2018

मोदींनी निरव मोदी व मेहुल चोक्सिला ३५ हजार कोटी दिले:राहुल गांधी

चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकरी संवाद मेळाव्यात 
राहुल गांधी यांचे वक्तव्य 
नागपूर/प्रतिनिधी:
केंद्रातील मोदी सरकार केवळ श्रीमंतांसाठी काम करतेय.भाजप सरकार हे उद्योगपतींचे सरकार असून गरिबांच्या व सामन्यांच्या सर्व खिश्यातले पैसे हे उद्योग पतींच्या खिश्यात घालत आहेत,आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली असून सुद्धा देशात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.याचा फायदा हा देशातील १०-१५ मोठ्या उद्योगपतींना भाजप सरकार करून देत आहे.देशातील गरीबांचा पैसा घेऊन पळालेले मेहुल चोक्सी व नीरव मोदी हे दोघे नरेंद्र मोदींचे चांगले मित्र आहेत व दोघेही मनरेगा योजनेचा एका वर्षाचा पैसा घेऊन परदेशात पळाले.असा घणाघाती आरोप भा.रा.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड येथील शेतकरी तसेच एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करून कुटुंबियांचे सांत्वन करून शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी ते नांदेड या गावी आले होते.
पंतप्रधान मोदींनी नीरव मोदी सारख्या माणसाला ३५ हजार कोटी रुपये दिले यातीलच 5 कोटी दादाजी खोब्रागडे यांच्यासारख्या संशोधक शेतकरी माणसाला दिले असते तर मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली असती,या 
भागातील युवक त्यांच्या कार्याने प्रेतीत झाला असता.जर सरकार उद्योगपतींना मदत करेल असेल तर, त्यांनी शेतकऱ्यांना सुद्धा मदत केली पाहिजे, मदत करन्या इतका पैसा सरकारकडे नक्कीच आहे.असेही ते यावेळी म्हणाले, केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही तो पैसा नक्कीच शेतकऱ्यांच्या खिशात टाकू,असे आश्वासन राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिले.यावेळी मदत म्हणून खोब्रागडे कुटुंबियांना काँग्रेसतर्फे अडीच लाख वडेट्टीवार यांच्या वतीने देण्यात आले दिले. उद्या पाच लाखांची अधिक मदत दिली जाणार आहे. नरेश पुगलिया यांच्याकडून १ लाख मदत देण्यात आली.
'मनमोहन सिंह सरकारच्या काळात पेट्रोलचे दर 140 डॉलर प्रति बॅरल होते. आज तेच दर 70 डॉलर प्रति बॅरल आहेत. म्हणजेच दर कोसळूनही जनतेला त्याचा फायदा होत नाही.आज दररोज पेट्रोलचे दर का वाढताहेत ?, हा एवढा पैसा कुठे जातोय?'', असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 
दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान राहुल गांधी यांचे नांदेड येथे आगमन झाले त्यानंतर ते स्व.दादाजी खोब्रागडे यांच्या घराकडे सभामंडपांकडे प्रस्तान केले.यावेळी एचएमटी वाणाचे संशोधक स्व.दादाजी खोब्रागडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मौन देखील पाळण्यात आला. राहुल गांधी येताच "राहुल गांधी आगे बढो" "हम तुम्हारे साथ है"चे नारे देखील लावण्यात आले.
यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश व अ.भा. काँ. कमिटीचे महासचिव अशोक गहलोत ,विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे,माजी खासदार नरेश पुगलिया,माजी खासदार नाना पटोले, आमदार विजय वडेट्टीवार,प्रकाश देवतळे,अविनाश वारजुरकर, खोब्रागडे कुटुंबीय आदी उपस्थित होते.
अखेर पुगलिया यांना मिळाला प्रवेश
राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीसाठी एकूण ६० जणांची यादी एसपीजी यंत्रानेला देण्यात आली होती.
मात्र सुरक्षेच्या नावाखाली फक्त २२ जणांचीच यादी मंजूर करण्यात आले व सुरक्षेच्या नावाखाली कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना अध्यक्ष राहुल गांधीयांच्या पासून दूरच ठेवण्यात आले.या ६० नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या यादीत माजी खासदार नरेश पुगलिया व राहुल पुगलिया यांचे देखील नाव होते,अखेर परियंत हे ओळखपत्र त्यांना मिळाले नव्हते अखेर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सचिव यशोमती ठाकूर यांच्या मध्यस्थीने पुगलिया यांना प्रवेश मिळाला.
एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांनी विकसित केलेल्या वाणाची पाहणी करतांना राहुल गांधी








শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.