रामटेक येथिल श्रीराम विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व रा.स्व.संघ,नागपुर जिल्हयाचे माजी संघचालक रामचंद्र मारोतराव देवतारे यांचा अमृतमहोत्सव रामटेक येथे आज दिनांक 1 जुलै 2018 रोजी स्थानीक गंगा भवनम सभागृहात सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गोळवलकर गुरूजी स्मृती प्रकल्प गोळवली,जिल्हा-रत्नागीरीचे व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे हे भूषविणार आहेत.नागपुर जिल्हयातील रास्वसंघाचे अधिकारी पदाधिकारी व देवतारे मास्तर यांचे चाहते मोठया संख्येत या कार्यक्रमाला
हजेरी लावणार आहेत.जुन्या रामटेक तालुक्यातील व सध्या मौदा तालुक्यात असलेल्या खात या गावात सामान्य कुटूंबात रामचंद्रराव यांचा 1 जुलै 2018 रोजी जन्म झाला.वडील रेल्वेत सिग्नल फीटर होते.मोठे बंधू त्यांना संघाच्या शाखेत आणले.अत्यंत प्रतिकूल परीस्थितीत रामचंद्रराव यांनी डबल एम ए पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. व रामटेकच्या श्रीराम विद्यालयांत शिक्षकाची नोकरी धरली.पुढे ते या शाळेचे मुख्याध्यापक झाले.रास्वसंघाचे अतिशय निष्ठेने कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांचे नाव संपुर्ण नागपुर विभागात मोठ्या सन्मानाने घेतले जाते.विविध जबाबदाऱ्या सांभाळत असतांना त्यांनी नागपुर जिल्हा संघचालक या पदावर अनेक वर्षे कार्य केले.रामटेकचे तरूण भारत वार्ताहर म्हणूनही त्यांनी सुमारे 25 वर्ष कार्य केले आहे रामटेकच्या संघ कार्यकर्त्यांसह सर्वच सामाजिक क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचे ते मार्गदर्शक
आहेत.रामटेकच्या सार्वजनिक क्षेत्रांतील या आधारवडाचा अमृतमहोत्सव हा या सर्वच कार्यकर्त्यांसाठी अतिशय आनंदाचा विषय आहे.या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन भानुप्रताप देवतारे,भारती देवतारे,नागेश देवतारे,भारती देवतारे येवतीकर,मंगेशसिंह येवतीकर,योगीता देवतारे कचवे व मनीश सिंह कचवे यांनी केले आहे.