12 जूनपासून अर्ज करण्याचे आवाहन
राज्यातील होतकरु व गुणवान उमेदवारांना संघ लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा परीक्षांची पूर्वतयारी करुन घेणाऱ्या नामांकित खासगी प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी गुणवत्ताधारीत विशेष शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत उमेदवारांना दिनांक 12 जून ते 22 जून 2018 पर्यंत ऑनलाईन करण्याचे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
संस्थेच्या www.siac.org.in या संकेतस्थळावर याबाबतची जाहिरात, निकष, पात्रता, अटी व शर्ती आणि ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची माहिती उपलब्ध असून ऑनलाईन अर्ज याच संकेतस्थळावर करावयाचे आहेत.
संघ लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत फेरीपर्यंत पोहोचणाऱ्या तथापि, अंतिमत: भारतीय प्रशाकीय सेवेमध्ये निवड न होणाऱ्या उमेदवारांसाठी गुणवत्ताधारीत विशेष शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेत भाग-1,भाग-2 व भाग-3 शिष्यवृत्ती देण्यात येतात. उमेदवारांना त्या वर्षीच्या मुलाखतीपर्यंतच्या कालावधीसाठी दिल्ली येथील नामांकित खासगी प्रशिक्षण संस्थेमध्ये मुलाखतीपर्यंतच्या उपलब्ध असणाऱ्या अभ्यासवर्गाला प्रवेश घेण्यासाठी भाग-1 शिष्यवृत्ती देण्यात येते. या भाग-1 शिष्यवृत्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.