वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात बनावट नोटा बाजारात चलणात आणणाऱ्या एकाला आर्वी पोलिसांनी अटक केली आहे.निखिल सुभाष वाडेकर वय 25 वर्षे असे या आरोपीचे नाव असून तो संतोषी माता जवळ शिरपूर रोड आर्वी येथील रहिवासी आहे.पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आर्वी पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता संतोषकडून २७ बनावट चलनी नोटा जप्त केल्या आहे.त्याला पोलिसांनी आर्वी येथून अटक केली.सोबतच आरोपी याचे सांगण्याप्रमाणे पंकज जाधव याचे रूम मधून एक कलर प्रिंटर दोन मोबाईल बनावट नोटा बनविण्याचे पेपर शंभर रुपयाच्या १७ बनावट चलनी नोटा, नकली नोटा बनविण्याचे साहित्य आरोपी याचे याचे रूम मधून जप्त केले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस.सा, आप वि.पोलीस अधिकारी प्रदीप मौराळे, यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक श्री अशोक चौधरी यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले हवालदार प्रवीण जवारे, मस्के, राजेश राठोड,विशाल मडावी यांनी पार पाडली,आरोपी विरुद्ध आर्वी पोलिस स्टेशन येथे अप क्रमांक ५१८ /२०१८ कलम 489 (अ) (ब) (क) (ड) (ई) भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Sunday, June 17, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য