चंद्रपूर जिल्हयातील ज्या बॅंका शेतक-यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे अशा बॅंकांमधून शासकीय/निमशासकीय यंत्राणेचे शासकीय जमा खाते काढून ज्या बॅंका पीक कर्ज संदर्भात चांगली कामगीरी करीत आहे. अश्या बॅंकेमध्ये ठेवण्याचे निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. हंसराज अहीर यांनी दिले आहे.
त्याची सुरूवात म्हणून खासदार निधीचे खाते हे पंजाब नॅशनल बॅंकेतून काढून बॅंक आॅफ इंडिया मध्ये स्थलांतरीत करण्याचे निर्देश देवून स्वतः पासून सुरूवात केली आहे. बॅंक अधिकारी पीक कर्ज वाटप, मुद्रा लोन व इतर व्यावसायीक लोन देण्यास टाळाटाळ करीत असून शेतकरी व लाभाथ्र्यांशी उध्दटपणे वागतात अशा तक्रारी मंत्राी महोदयांकडे येत होत्या. याची गंभीर दखल घेतली असून ज्या बॅंका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे, त्यांचेवर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
पंजाब नॅशनल बॅंकेची पीक कर्जाच्या संदर्भात कामगीरी अत्यंत निराशाजनक होती. पीएनबी बॅंकेला सन 2015-16 मध्ये 8 टक्के, 2016-17 मध्ये 7.08 टक्के, 2017-18 मध्ये 6.93 टक्के तर 2018-19 मध्ये 7/06/2018 पर्यंत 0 टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. यामुळे संतप्त झालेल्या मंत्राी महोदयांनी खासदार निधीचे खाते काढून बॅंक आॅफ इंडिया बॅंकेकडे स्थानांतरीत करण्याचे निर्देश दिले आहे.