সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, June 22, 2018

ताडोब्यात माधुरीच्या बछड्याला आवरता नाही आला बाटलीतून दुध पिण्याचा मोह

नागपूर/ललित लांजेवार:
ताडोबाच्या जंगलातील वाघांचे किस्से आजवर आपण बरेच ऐकले असेल.त्यात कधी जंगलातून मजुरांच्या जेवणाचा डबा पळवने,कधी मजुरांच्या कामावरचे घमेलेच पळवने तर कधी याच ताडोबाच्या वाघांचा आक्रमक पवित्रा ,तर कधी मायाळूपणा असे बरेच किस्से ताडोबात नेहमीच आपण बघितले आहेत.मात्र आता एक उपद्‌व्याप परत ताडोबाच्या आगाझरी बफर झोन परिसरात बघायला मिळाला."माधुरी" नावाच्या वाघिणीच्या बछड्याने १२ जून रोजी कमालच केली. ताडोबा फिरायला आलेल्या एखाद्या लहान बाळाच्या दुधाची बाटली ताडोबाच्या जंगलात पडली आणि हि हाती लागली माधुरीच्या बछड्याच्या हाती लागली.
पर्यटकाची चुकून पडलेली दुधाची बाटली माधुरीच्या बछड्याच्या हाती लागली अन या बाटलीने दूध पिण्याचा त्या बछड्याने हट्टच केला.बाटली हातात सापडताच बाटलीला खेळतच त्याने दूध बाटलीच्या बुचाला चोखून पिण्याचा सरावही केला. मात्र त्याला ते नेमके काय आहे समजल नाही. बारामतीच्या पर्यटकांना दोन दिवस सलग दिसलेले हे चित्र माणूस, निसर्ग आणि जनावरांमधील बदलाची प्रचिती देत होते.ताडोबा जंगलात अनुभवलेले हे क्षण ताडोबा फिरायला आलेल्या बारामतीकरांनी कॅमेऱ्यात कैद केले आहे. बारामतीचे हौशी निसर्ग छायाचित्रकार संदीप तावरे, सतीश परजणे, प्रवीण जगताप, अमर बोराडे, नितीन रणवरे, चेतन पाटील आदी चार पर्यटक काही दिवसांपूर्वी ताडोबाच्या जंगलात सफरीसाठी आले होते. ११ व १२ जून रोजी त्यांनी ताडोबाची सफर केली. त्या वेळी त्यांना "माधुरी' वाघिणीचे दर्शन झाले. माधुरी वाघीण आपल्या चार बछड्यांसह रस्त्यावरच बसलेली असल्याने शांतपणे अर्धा तास फक्त तिला न्याहाळण्याशिवाय या पर्यटकांच्याही हातात काही नव्हते. मात्र यादरम्यानची आश्‍चर्याची गोष्ट घडली. माधुरी व तिच्या बछड्यांचे फोटो व व्हिडिओ काढताना संदीप तावरे यांच्या लक्षात आले, की एका बछड्याला रस्त्याच्या कडेला अचानक एक दुधाची बूच असलेली बाटली सापडली आहे. त्याने ती तोंडाला लावल्यानंतर त्यातून थोडे आलेले दूध त्याने पिले असावे, त्यानंतर या बाटलीत काहीतरी गोड आहे असा त्याचा समज झाला आणि त्याने त्या बाटलीचे तोंड उघडण्यास सुरवात केली. बराच वेळ तो हे तोंड उघडत होता. त्याने एकट्यानेच त्या बाटलीच्या बुचाला तोंड लावले आणि दूध गट्टम केले, असे निरीक्षण तावरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नोंदवले आहे.असाच हा उपद्‌व्याप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.या संपूर्ण प्रकारावरून हि बाटली आली कुठून याचा शोध घेणे सुरु आहे.
 खरेतर ताडोबा जंगलात प्लॅस्टिकचे काहीही घेऊन दिले जात नाही, तेथील पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या जीपमध्येही त्याविषयी सक्ती केली जाते, मात्र अशा स्थितीत प्लॅस्टिकची बाटली तेथे आढळणे व ती वाघाच्या तोंडात जाणे हा एक चिंताजनक विषय वन्यप्राण्यासाठी आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.