সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, June 27, 2018

अंधाऱ्या रात्री महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने खंडित वीजपुरवठा पुर्ववत

नागपूर/प्रतिनीधी:
सोमवारचा दिवस संपून मंगळवार दिवस लागला होता, अश्यावेळी रात्री 12 वाजून 28 मिनिटांच्या सुमारास कॉग्रेसनगर येथील ऑल इंडीया रिपोर्टर्स, मेडीकल कॉलनीम तकीया या भागातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला, सर्वत्र अंधाराचे साम्राज्य वैतागलेली लोकं रस्त्यावरील कुत्र्याला दगड मारत होती आणि ते विव्हळत असल्याचे त्याच्या विचित्र आवाजावरून भासत होते. शांततेचा भंग करत महावितरण कार्यालयातील फोनची बेल सतत वाजत होती पण उचलायला वेळ नव्हता आणि समजा फोन उचलला तरी अपेक्षित प्रश्नच. ज्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरु होता, कदाचित समोरच्याला ते पटणार नसेल कारणही तसच होत, पाऊस लांबल्याने वाढलेल्या अंगाची लाही-लाही करणा-या गर्मीमुळे शहरी माणसाचे अवघड झालेलं जगणं इकडे फोनवरून वाहिनीवरील बिघाड शोधत फिरणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांकडून परिस्थितीचा वेध जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु होता.
लोकांचं देखील बरोबर होत, पण त्यांना काही समजून सांगावं आणि त्यांनी समजून घ्यावं अशी परिस्थिती सदैव नसते. 33/11 केव्ही उपकेंद्रातून निघणा-या 11 केव्ही ऑल इंडीया रिपोर्टर्स या वीज वाहिनीवरील वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे प्रोटेक्शनला असणारे 10 एमव्हीए क्षमतेचे उपकेंद्रातील रोहीत्रही ओव्हर करंट्मुळे एनकमरसह ट्रीप झाले. वीजपुरवठा सुरळीत करायला महावितरण कर्मचारी कंत्राटदाराच्या कर्मचा-यांसमवेत बिघाड शोधण्यास झटत होती. 12 वाजून 31 मिनिटाला रोहीत्र आणि एनकमर यशस्वीरित्या चार्ज करण्यात येऊन वाहीनी नादुरुस्त असल्यावे जाहीर करण्यात आले आणि वाहीनीच्या प्रत्येक खांबावरील इन्स्युलेटरची तपासणी सुरु झाली यात सुळे गल्लीजवळील सर्वात अखेरच्या खांबावरील इन्स्युलेटर फ़ुटलेले आढळले, ते बदलण्याची प्रक्रीया सुरु केली तर अखेरचा खांब असल्याने तेथील वीज वाहक तार (Conductor) अधिक तानलेली असल्याने जोर लावूनही नादुरुस्त डिस्क इन्स्युलेटर वीजखंबाला घट्ट चिकटल्याने काढता येणे अशक्य होते. गर्मीमुळे हैराण झालेले तेथे एकत्र जमलेले नागरिक मदतीला आले, त्यांनीही वीज वाहक तारेला ओढण्यासाठी कार्यरत कर्मचा-यांना मदत केली तरीही ते निघता-निघत नव्हते. त्यामुळे उपस्थितांची चलबिचल वाढली होती अखेर शेवटचा प्रयत्न म्हणून खांबाला चिकटलेल्या डिस्कपुढे दुसरी डिस्क लावण्यात येऊन ट्रायल घेण्याचे ठरले, काळजी वाढत चाललेली, रात्रीचे 1 वाजून 58 मिनिटे झाली, पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न करून बघूया. अधिकाऱ्यानी निर्णय घेतला. शांतता पसरली होती. बटन दाबल्यावर कशाचाही आवाज झाला नाही. आनंदाची झुळूक मनात उठली होती. डोळे ताडकन उघडले प्रकाश सर्वदूर पसरलेला होता. रात्रीच्या अंधारात प्राणाची बाजी लावीत सतत दीड तास सुरु असलेल्या प्रयत्नांचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या ग्राहकांनी वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी चाललेले प्रयत्न बघून महावितरणप्रती आभार व्यक्त केले.
महावितरणचे कर्मचारी, अधिकारी आपले कर्तव्य बजावून सेवा देत असतात. वादळ वारा, वीज यांमुळे पावसाळयात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढते. पण महावितरण दिवसेंदिवस आपल्या सेवेत सुधारणा करतेय. म्हणूनच तर पूर्वी सारखे भारनियमन नाही किंवा वीज गेल्यावर जास्त वेळ वाट पाहावी लागत नाही. एरव्ही आजवर न झालेली अत्युच्य मागणी, उन्हाळ्यात भारनियमन न करता महावितरणने पूर्ण केलेली आहे आणि हीच महावितरणच्या कामाची पावती आहे. महावितरण कर्मचा-यांचा ग्राहकांशी थेट संबंध येत असल्याने ग्राहकांच्या रोषाला बळी पडावे लागते. बरेचदा मारहाण होते. काहींनी सेवा देतांना आपले प्राण देखील गमावले आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास थोडावेळ वाट पाहावी आणि बाजू समजून घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.