दोन जिवंत काडतुसे जप्त
चंद्रपुरात देशीकट्टा जवळ बाळगणाऱ्या एका युवकाला रामनगर आणि शहर पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास अटक केली. त्याच्याजवळून एक देशीकट्टा आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहेत़, इमरान फय्याज खान रा़.बी.एम.टी चौक रयतवारी कॉलरी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे़.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रामनगरचे गुन्हे शोध पथक आणि सिटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक यांचे संयुक्त पथक तयार करून गुरुवारी संध्याकाळी ७़३० वाजता आरोपी घइमरान फय्याज खान रा़.बी.एम.टी चौक रयतवारी कॉलरी याच्या घरी धाड घालून घराची झडा झडाती घेतली़ यावेळी आरोपीच्या घरून देशीकट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली़
ही कारवाई पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस निरीक्षक दिपक गोतमारे. शहर पोलीस निरीक्षक भगत. उपनिरीक्षक कापडे, वाघमारे, हेड कॉन्स्टेबल प्रमोद कोटनाके, सीटीचे पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे़.