वेळेची व पैशाची बचत होणारश्री. विनोद बोंदरे;आरोग्य सुविधा संजीवनी ठरणार श्री.कैलाश चिरूटकर
महानिर्मिती परिवाराच्या आरोग्याची काळजी घेणारी योजनाश्री. नितीन चांदुरकर
जुलै महिन्यातील आरोग्य सुविधेचा तारीखनिहाय कार्यक्रम जाहीर
नागपूर/प्रतिनिधी:
वीज उत्पादनाच्या क्षेत्रातील नामांकित अश्या महानिर्मिती कंपनीच्या
मुंबईतील सुमारे ६०० अधिकारी-कर्मचारी व कुटुंबियांसाठी अद्ययावत आरोग्य
विषयक सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीने महानिर्मिती व ग्लोबल हॉस्पिटलच्या
परस्पर सहकार्यातून अभिनव योजना सुरु करण्यात आली आहे.
महानिर्मितीच्या
धारावी, माटुंगा, मुंबई येथील कार्यालयातील पहिल्या माळ्यावर बाह्य रुग्ण
विभाग स्थापन केला असून दर शुक्रवारी दुपारी २ ते ५.०० या कालावधीत ग्लोबल
हॉस्पिटल मुंबई यांचे मार्फत विविध क्षेत्रातील निपुण व तज्ज्ञ वैद्यकीय
अधिकारी यांचेमार्फत संपूर्ण आरोग्य विषयक तपासणी व आरोग्यविषयक
सल्ला-मार्गदर्शन (विनामुल्य) केले जाणार आहे.
बाह्य रुग्ण विभागाचे उद्घाटन नुकतेच महानिर्मितीचे कार्यकारी
संचालक(मानव संसाधन) श्री. विनोद बोंदरे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी संचालक(संवसु -१) श्री. कैलाश
चिरूटकर, कार्यकारी संचालक(माहिती तंत्रज्ञान) श्री. नितीन चांदुरकर,ग्लोबल
हॉस्पिटल मुंबईचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ.मिलिंद फडके प्रामुख्याने मंचावर
उपस्थित होते.
महानिर्मितीच्या मुंबई येथील मनुष्यबळाला दैनंदिन कामाच्या ठिकाणी आरोग्य
विषयक सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या वेळेची बचत होईल, गर्दीपासून
सुटका मिळेल, सोबतच अशा पद्धतीच्या आरोग्य सल्ला मार्गदर्शनाकरीता मुंबईत
मोठी किंमत मोजावी लागत असल्याचे श्री. विनोद बोंदरे यांनी सांगितले.
महानिर्मितीच्या मुंबई येथील मनुष्यबळाला हि आरोग्य सुविधा संजीवनी ठरणार
असल्याचे श्री. कैलाश चिरूटकर म्हणाले तर श्री. नितीन चांदुरकर म्हणाले कि
सध्यस्थितीत महानिर्मितीमध्ये नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असल्याने आनंदी
वातावरण आहे व त्यात विनामुल्य आरोग्य सुविधा म्हणजे दुग्धशर्करा योग आहे.
एकूणच महानिर्मिती परिवाराच्या आरोग्याची काळजी घेणारी हि योजना असल्याचे
त्यांनी सांगितले.
प्रारंभी प्रास्ताविकातून मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. अनिल मुसळे
यांनी आरोग्यविषयक योजनेची सविस्तर भूमिका मांडली व याव्यतिरिक्त हृदयरोग,
लकवा किंवा अचानक घडणाऱ्या प्रसंगी कशाप्रकारे मनुष्य प्राण वाचवायचे याचे
प्रशिक्षण देखील आगामी काळात विद्युत केंद्र निहाय देण्यात येणार असल्याचे
त्यांनी सांगितले.
समारंभाला श्री. प्रमोद नाफडे मुख्य अभियंता(स्थापत्य), श्री. दत्तात्रय
साळुंखे उप मुख्य अभियंता (स्थापत्य), श्री. सुरेंद्र माहुरे अधीक्षक
अभियंता (स्थापत्य), सौ. लता संख्ये उप महाव्यवस्थापक(मासं), सहाय्यक
महाव्यवस्थापक(मासं) श्री समीर देऊळकर, श्री. मिसाळ, श्री. योगेंद्र पाटील,
वरिष्ठ व्यवस्थापक (मासं) श्री. कौस्तुभ इंगवले, श्री. रणधीर पाठक,
महानिर्मितीचे अधिकारी-कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. अतिशय समर्पक व
सूटसुटीत सूत्र संचालन व आभार प्रदर्शन औद्योगिक संबंध अधिकारी श्री.
विलास हिरे यांनी केले.