সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, June 16, 2018

जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेत इको-प्रोचे रक्तदान

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुर शासकीय रक्तपेढ़ी, सामान्य रुग्णालय मधे रक्ताचा तूटवडा निर्माण झालेला आहे. ही बाब लक्षात घेऊन आज इको-प्रो तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
वर्षभरात बरीच संस्था-संघटना, राजकीय पक्ष, महाविद्यालय यांचे वतीने रक्तदान होत असते. मात्र, दरवर्षी मे-जून आणि दिवाळीच्या महिन्यात रक्तपेढ़ी मधे रक्ताचा तुटवड़ा निर्माण होन्याची समस्या निर्माण होत असते. कारण, या काळात रक्तदान शिबिर संख्या कमी असल्याने, रक्तसाठा कमी असतो. परन्तु मागणी कायम असल्याने रक्ताच्या कमतरते मुळे हा काळ शाशकीय रक्तपेढीस कठिन जातो. 
कारण, दर दिवशी रक्ताची गरज असतेच. सिकलसेल, थैलसीमिया, अनीमिया, टीबी रुग्ण, सामान्य रुग्णालयात प्रसूती साठी भरती असलेल्या ग्रामीण महिला, अपघात ग्रस्त रुग्ण यांना त्वरित रक्त देण्याची गरज असते. ही मागणी मोठी असते आणि या काळात रक्तदान शिबिर किंवा रक्तदाते कमी असल्याने मागणी नुसार पूर्तता करणे अडचनीचे असते. अश्यावेळी रुग्णाला रिप्लेसमेंट म्हणजे आवश्यक ग्रुप चा रक्तदाता आणावे लगते, ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णाच्या परिवारास रक्तदाता शोधणे सहज शक्य होत नाही. 
वाढदिवस किंवा विशेष दिवसा निमित्त वर्षभरात अनेक शिबिरांचे आयोजन केले जाते. या दिवसांचे औचित्य आहेच मात्र, अश्या शिबिरांची खरी गरज संकटकाळात महत्वाची ठरते. चंद्रपुर शहरात बरेचदा शिबिरातुन विक्रमी रक्तदान केले जाते, इतके की संख्या हजारात असते. मात्र या विपरीत मे-जून आणि ऑक्टो-नोव्हे महिन्यात दरवर्षी रक्ताचा तुटवडा असतो. या महिन्यात सुद्धा विविध संस्था-संघटना, राजकीय पक्ष आणि महाविद्यालये यांनी वर्षात में-जून आणि दिवाळीच्या काळात सुद्धा मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची गरज असते. आज रुग्णाची रक्ताची गरज लक्षात घेऊन इको-प्रो तर्फे शनिवार 16 जून रोजी सामान्य रुग्णालय, शाशकीय रक्तपेढ़ी मधे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिरातून जवळपास ३० पेक्षा अधिक रक्तदातेनी रक्तदान केले. या शिबिर मधून मिळणारे रक्त फार तर 1-2 दिवस ची गरज पूर्ण करेल, तेव्हा चंद्रपुर शहरातील सर्व संस्था-संघटनानी सुद्धा रक्तदान शिबिर चे आयोजन करून या संकटकालीन परिस्थितीत सहकार्य करण्याचे आवाहन इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले आहे. 
आज झालेल्या शिबिरातून इको-प्रो चे बंडू धोतरे, योजना धोतरे, नितिन बुरडकर, रवि गुरनले, बिमल शहा, वैभव मडावी, कपिल चौधरी, हरिदास कोराम, जीतेन्द्र वालके, सावन कालीवाले, राजेश व्यास, जयेश बैनलवार, हरीश मेश्राम, सह्याद्रि प्रतिष्ठान चे दिलीप रिंगने, इरफान शेख, प्रशील ढोके, हर्षल मुठे, विशाल मराठे, संघम सेलकर, रुपेश केळझरकर, आलोक गोविदवार, सचिन सारडा, नितेश वाढई, प्रमोद गड़पल्लीवार, प्रतिक कडुकर, निखिल आक्केवार, सुमित कोहले, वनपाल किरण धानकुटे, वनरक्षक देवीदास बेरड़ आदिनी रक्तदान करून सहकार्य केले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.