संजयभाऊ एकरे यांनी केले स्वागत
नुकतीच
देशात मान उंचावून टाकणारी बाब आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी केली
आहे.चंद्रपूर जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचं नाव रोशन केल्यानं
सर्वत्र कौतुक होत आहे. मिशन शौर्य अंतर्गत एव्हरेस्टवीर मनीषा धुर्वे व
प्रमेश आडे या एवरेस्टवीरांचे गडचांदूर नगरीत रणसूर्य वीर बाबुराव शेडमाके
चौक येथे जगदगुरु तुकोबाराया सार्वनिक वाचनालय गडचांदूरचे अध्यक्ष
संजयभाऊ एकरे व सौ.दिपाली संजय एकरे यांच्या हस्ते भव्य स्वागत करण्यात
आले.
यावेळी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइस फेडरेशनचे अध्यक्ष राष्ट्रपती
पुरस्कार प्राप्त डॉ.सुधाकर मडावी, गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था
चांदागड तालुकाअध्यक्ष आदर्श शिक्षक पंढरी मरास्कोल्हे सर,गोंडीयन
संस्कृती संवर्धन समितीचे दत्ता येडमे सर,सुरेश टेकाम सर,वनपाल सोयाम
सर,मराठा सेवा संघाचे अशोक घुंगरुड सर सौ. घुंगरुड मॅडम,सुभाष बेरड सर,
प्रवीण काकडे हर्षद शेतकी आदींनी एव्हरेस्टवीरांचे स्वागत केले व पुढील
यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.