गडचांदूर/प्रतिनिधी:
"हाथो कि लकीरों पे कभी ऐतबार मत करना,तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नही होते"
या पंक्तीत खरा उतरणारा विध्यार्थी म्हणजे सावित्रीबाई
फुले महाविद्यालय गडचांदूर येथील वर्ग १२ वीत शिकणारा अमोल शंकर हिवरकर
होय.इमारतीच्या गच्चीवर खेळत असतांना जिवंत विद्युत तारांना स्पर्श
केल्यामुळे त्याला आपले दोन्ही हात गमवावे लागले. पण
त्याने शिक्षणाची जिद्द सोडली नाहीं.यंदा १२ मध्ये त्याने परीक्षा दिली
होती.परीक्षेत साहिल लुकमान बक्ष या लेखनिकाच्या सहाय्याने परीक्षा दिली व
उत्तीर्ण झाला.
परीक्षा
उत्तीर्न होणेच म्हणजे जीवन नव्हे हे त्याने आधीच सिद्ध केलं
होते.जीवनाच्या परीक्षेत त्याने अनेक निकाल पास केले हे मात्र नक्की. त्याचे
जीवन किती खडतर असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाहि. अमोलच्या जिद्दीकडे
बघितले तर सर्वसामान्य विध्यार्थ्यांना हेवा वाटावं असा त्याचा शालेय
प्रवास आहे.
साधा आणि
मनमिळाऊ वृत्तीचा अमोल आपल्या जीवनातील दुखाना बाजूला ठेऊन जीवनातील
प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतो. तालुक्यातील खिर्डी या गावातील अमोल 11 व 12
चे शिक्षण गडचांदूर येथिल सावित्रीबाई फुले कनिष्ठ विद्यालयामध्ये पूर्ण
केले असून त्याला शाळेचे प्राचार्य,प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांनी
आपल्या जीवनात यशस्वी होवो तसेच भावी आयुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या
आहे.