महावितरणच्या विद्युत पोलवर देखभाल व दुरुस्तीचे काम सुरु असतांना चंद्रपूर येथील एका कंत्राटी वीज कर्मचारी पोल्वरून पडून जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घुटकाळा वार्डातील नेहरू चौकात घडली. विनोद कुमरे असे या कंत्राटी कर्मचार्याचे नाव आहे.
सोमवारी सकाळच्या सुमारास घुटकाळा वार्डातील नेहरू चौकात महावितरणच्या पोलवर देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यासाठी विनोद कुमरे हा कर्मचारी चढला होता. मात्र सेफ्टी बेल्टचा दोर मजबूत नसल्याने तो जवळपास २५ फुटावरून खाली पडला यात त्याला गंभीर दुखापत झाली, त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शिनी दिली.मिळालेल्या माहिती नुसार हा कर्मचारी महानगरपालिकेच्या अंतर्गत कार्यरत होता.